Maharashtra Politics : मोठी बातमी ! छगन भुजबळ CM देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला वर्षावर, भेटीचं कारण काय?

Chhagan Bhujbal Meet Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर वर्षा या शासकीय बंगल्यात गृहप्रवेश केला. त्यांच्या गृहप्रवेशानंतर वर्षा बंगल्यावर आज पहिलीच राजकीय भेट घडून आलेली बघायला मिळाली.
Chhagan Bhujbal Meet Devendra Fadnavis
Chhagan Bhujbal Meet Devendra FadnavisSaam Tv News
Published On

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी आता समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. भुजबळ यांना नव्या महायुती सरकारमध्ये मंत्रिमंडळ बैठकीत स्थान मिळालं नाही. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होती. याशिवाय छगन भुजबळ यांना राज्यसभेची देखील संधी मिळाली नाही. त्यामुळे याबाबतची खंत त्यांनी भर पत्रकार परिषदेत व्यक्त केली होती. यानंतर आता छगन भुजबळ देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले आहेत. छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर वर्षा या शासकीय बंगल्यात गृहप्रवेश केला. त्यांच्या गृहप्रवेशानंतर वर्षा बंगल्यावर आज पहिलीच राजकीय भेट घडून आलेली बघायला मिळाली. छगन भुजबळ हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर गेले. दोन्ही नेत्यांच्या भेटीचे फोटो देखील समोर आले आहेत. या भेटीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. या भेटीत काही राजकीय चर्चा झाली का? याबाबतची माहिती समजू शकलेली नाही. पण देवेंद्र फडणवीस यांची भेट का घेतली? याबाबत छगन भुजबळ यांनी माध्यमांना स्पष्टीकरण दिलं आहे. भुजबळांनी फडणवीसांच्या भेटीनंतर प्रतिक्रिया दिली आहे.

Chhagan Bhujbal Meet Devendra Fadnavis
Rahul Gandhi on Caste Census : 'जातनिहाय जनगणनेचं स्वागत, पण...'; राहुल गांधींच्या मोदी सरकारकडे प्रमुख ३ मागण्या

'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने जो निर्णय घेतला, देशात जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल आम्ही सर्व देशातील ओबीसी, भटके-विमुक्त आनंदीत आहोत. आम्ही सर्व त्यांचे आभार मानतो आहोत. आम्हाला ताबोडतोब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणं शक्य नाही. त्यामुळे मी स्वत: जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांना पुष्पगुच्छ दिलं आणि आभार मानले, आणि त्यांना सांगितलं की, मोदींना सुद्धा कळवा,' अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली.

Chhagan Bhujbal Meet Devendra Fadnavis
Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना, केंद्रीय कॅबिनेटचा निर्णय; सर्वोच्च न्यायालयाचा उल्लेख करत प्रकाश आंबेडकरांची मोठी प्रतिक्रिया

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com