Chhagan Bhujbal : अजितदादांचा भुजबळांना पुन्हा डच्चू, मंत्रिपद काय समितीतंही स्थान नाही

Chhagan Bhujbal : मंत्रिपद न मिळालेल्या छगन भुजबळांना अजित पवारांनी पुन्हा एकदा डावलल्याची चर्चा रंगलीय. धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांना नेमकं कसं डावललंय. भुजबळांना डावलून भुजबळविरोधकांना संधी दिली जातेय का?
Chhagan Bhujbal No Place in Legislative Committee
Chhagan Bhujbal No Place in Legislative CommitteeSaam Tv News
Published On

भरत मोहोळकर, साम टीव्ही

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं सूप वाजलं. त्यानंतर विधीमंडळ समित्यांची घोषणा करण्यात आली. मात्र या समितीत अजित पवारांनी वादग्रस्त मंत्री धनंजय मुंडे आणि मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेल्या छगन भुजबळांची एकाही समितीवर नियुक्ती केलेली नाही. त्यामुळे या दोघांना डावलल्याच्या चर्चा रंगल्यात. मात्र कोणत्या पक्षाला किती समित्यांचे प्रमुखपद मिळालंय? पाहूयात.

कोणत्या पक्षाला किती समित्या?

भाजप- 9

शिंदे गट- 7

राष्ट्रवादी (AP)- 8

काँग्रेस- 1

अपक्ष- 1

दरम्यान, भुजबळांना डावल्याचं समोर आल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी मात्र विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात चेंडू टोलावलाय. महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात छगन भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ मंत्र्याला वगळण्यात आलं. त्यामुळे छगन भुजबळांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली होती. एवढंच नाही तर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्रिपद अजित पवारांनी स्वतःकडे ठेवलं. त्यामुळे भुजबळांच्या नाराजीत आणखीच वाढ झालीय. त्यामुळे भुजबळांनी अजित पवारांच्या उपस्थितीतील बैठकांना दांडी मारली होती. कोणत्या बैठकांना भुजबळांनी दांडी मारली? पाहूयात.

दादांच्या बैठका, भुजबळांची दांडी?

मंत्रिपद न दिल्याने दर मंगळवारी होणाऱ्या बैठकीला दांडी

पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीला अनुपस्थित

शिर्डीतील अधिवेशाला तटकरेंच्या अग्रहावरुन काही तासांची उपस्थिती

अजित पवारांवर उघड नाराजी व्यक्त केल्यानंतर भुजबळांची भाजपसोबत जवळीक वाढल्याचं चित्र आहे. त्यातच आता विधीमंडळ समित्यामध्ये भुजबळांचे कट्टर विरोधक सुहास कांदेंना बळ दिल्याने भुजबळ आणि मुंडेंची कोंडी केली जातेय का? अशी चर्चा रंगलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com