Chhagan Bhujbal Receives Threat Saam TV
महाराष्ट्र

Chhagan Bhujabal: मोठी बातमी! छगन भुजबळांना धमकी, १ कोटींच्या खंडणीची मागणी

Chhagan Bhujbal Receives Threat: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना धमकीचा फोन आला. त्यांच्याकडे १ कोटींची खंडणीची मागणी करण्यात आली. आरोपीला पोलिसांनी अटक केली.

Priya More

नाशिकमधून आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आलीये. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना धमकी देत १ कोटींच्या खंडणीची मागणी करण्यात आली. छगन भुजबळ यांना फोन करून आरोपीने खंडणीची मागणी केली. भुजबळ यांच्या फोनवर त्यांचे स्वीय सहाय्यक संतोष गायकवाड आणि संशयित आरोपीमध्ये संवाद झाला होता. याप्रकरणी नाशिक पोलिसांनी आरोपीला सापळा रचत अटक केली.

छगन भुजबळांच्या त्र्यंबकेश्वर येथील फार्म हाऊसवर आयकर विभागाची धाड पडणार असून त्या पथकात मी असून धाडीत मी सहकार्य करेल अशी आरोपीने बतावणी केली होती. आयकर विभागाच्या धाडीत मदत करण्यासाठी छगन भुजबळ यांच्याकडे १ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. छगन भुजबळांकडे खंडणी मागितल्यामुळे खळबळ उडाली. यानंतर नाशिक पोलिसांनी तात्काळ कुठून फोन आला आणि कुणी केला याचा तपास सुरू केला. अवघ्या काही तासांत त्यांनी आरोपीचा शोध घेतला.

छगन भुजबळ यांना फोन करून खंडणी मागणाऱ्या आरोपीला नाशिक पोलिसांनी सापळा रचत अटक केली. संशयित आरोपीने गुजरातच्या धरमपूर इथे पैसे घेऊन बोलावले होते. मात्र तिथं हुलकावणी देत पेठ तालुक्यातील करंजाळी गावात पैसे घेण्यासाठी बोलावले. राहुल भुसारे या उच्चशिक्षित तरुणाने खंडणीची मागणी केली होती. संशयित आरोपी पेठ तालुक्यातील करंजाळी गावातील रहिवासी आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस त्याची चौकशी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT