chhagan bhujbal, governor bhagat singh koshyari , Mumbai, Maharashtra , Marathi Manus,  saam tv
महाराष्ट्र

Chhagan Bhujbal : 'त्या' वक्तव्यावरुन छगन भुजबळांनी राज्यपालांना दिला मित्रत्वाचा सल्ला

राज्यपालांच्या एका वक्तव्यावरुन त्यांच्यावर काॅंग्रेस आणि एनसीपीचे नेते टीका करु लागले आहेत.

साम न्यूज नेटवर्क

- तबरेज शेख

नाशिक : राज्यपाल (governor bhagat singh koshyari) महोदय आमचे मित्र आहेत पण अशा गोष्टी बोलण त्यांनी टाळलं पाहिजे असे मत राष्ट्रवादीचे (ncp) ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी व्यक्त केले. खरंतर अशा विषयामुळे वाद वाढतात. राज्यपाल हे निर्विवादीत असले पाहिजेत असे भुजबळ यांनी नमूद केले. (governor bhagat singh koshyari news)

अंधेरी पश्चिम येथील एका कार्यक्रमात गुजराती लोक मुंबईतून गेले तर पैसे राहणार नाहीत. आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची (Mumbai) ओळख आहे ती राहणार नाही, असं वक्तव्य राज्यपालांनी शुक्रवारी केलं हाेतं. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या या वक्तव्यानंतर एनसीपी, काॅंग्रेस नेते आक्रमक झाले आहेत. त्यांनी महाराष्ट्र संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल माफी मागवी अशी मागणी नेत्यांच्या माध्यमातून जाेर धरु लागली आहे.

आमदार छगन भुजबळ म्हणाले मुंबई ही कोळी आणि आगरी समाजाची आहे. ब्रिटिशांना देखील मुंबई आवडली होती. देशातील अनेक लोकांनी मुंबईत येऊन मुंबईच्या भरभराटीला हात लावले. असं असलेतरी मुंबई हे महाराष्ट्राची आहे हे कोणी नाकारू शकत नाही. मुंबईत असलेली भौगोलिक परिस्थिती, संस्कुती आणि भाषा ही सगळी मराठी माणसाची आहे. अनेक उद्योगपती मुंबईत राहतात. मुंबईत सोयीसुविधा राज्यातून जातो पाणी, वीज आणि भाजीपाला हे नाशिक आणि पुण्यातून जातो. कोरोनामध्ये गेलेले अनेक नागरिक विविध राज्यातून मुंबईत परत आले. तिकडच्या मुख्यमंत्र्यांनी जाण्याची गरज नाही असे सांगितले तरी सगळे परत आले असेही भुजबळ यांनी नमूद केले.

नाशिकला सरकारनं भरघोस मदत करावी

मुख्यमंत्री आज नाशिक दौऱ्यावर आहेत त्यांचं स्वागत आहे असं आमदार भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दाै-याबाबत नमूद केले. ते म्हणाले मलाही बैठकीला आमंत्रण होत पण मला इतर कामामुळे जाणं शक्य झाले नाही. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणि इतर कामांना सरकारनं भरघोस मदत करावी अशी अपेक्षा यावेळी भुजबळांनी व्यक्त केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kumbha Rashi : आरोग्यात काळजी, नोकरी-व्यवसायात प्रगती, कसा असेल कुंभ राशीचा आजचा दिवस

Gautam Gaikwad Missing: सिंहगडावरील गौतमचा अपघात की घातपात? सीसीटीव्हीतील हुडीवाल्यामुळं गूढ वाढलं

Maval Farmer: 'जीव गेला तरी चालेल एक इंचही जमीन देणार नाही'; रिंग रोडला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

Uttar Pradesh Crime: ५ दिवसाआधी पत्नीच्या मृत्यू, सहाव्या दिवशी दीड वर्षाच्या मुलासोबत BSF जवानाची गंगेत उडी

कोकणी माणसाला चाकरमानी म्हणायचं की कोकणवासीय?, कोकणी लोकांच्या भावना जाणून घ्या

SCROLL FOR NEXT