Chhagan Bhujbal Saam TV
महाराष्ट्र

Chhagan Bhujbal: जिल्हा परिषद, बँका, साखर कारखाने कुणाकडे? मराठा समाज मागास कसा? छगन भुजबळांचा सवाल

Chhagan Bhujbal On Maratha Reservation: मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळणार आहे, तर खोटे दाखले देऊन ओबीसी मध्ये येण्याचं कारण काय?" असा सवालही छगन भुजबळ यांनी उपस्थित केला.

अभिजीत सोनावणे

Chhagan Bhujbal Press Conference:

मराठा आरक्षणासंदर्भात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. मराठा आरक्षणासंबंधी राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे हा अहवाल देण्यात आला आहे. यावर ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले छगन भुजबळ?

"सोलापूरमध्ये एका कुटुंबातील सर्वांना कुणबी प्रमाणपत्र मिळालं. हे कुणबीकरण थांबवा. हे वेगळं आरक्षण देणार आहात, त्यात त्यांना टाका, ज्यांना मागील २- ३ महिन्यात कुणबी प्रमाणपत्र दिलं, त्यांना त्यात टाका. नारायण राणे सारखं एखाद कुटुंब ते म्हणाले आम्हाला नको कुणबी प्रमाणपत्र, जबरदस्तीने केलेले कुणबी नव्या आरक्षणात टाका," असे छगन भुजबळ यावेळी म्हणाले.

मराठा समाज मागास कसा?

तसेच "सामाजिक आणि शैक्षणिक मागास असं मुख्यमंत्री म्हणाले. मात्र मराठा समाज रुलिंग आहे, मग मागास कसा? त्यामुळे मोठी अशांतता निर्माण होईल. शैक्षणिक आरक्षण द्यायला हरकत नाही. आजच सग्या सोयऱ्या विरोधात लाखो हरकती आल्यात. मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळणार आहे, तर खोटे दाखले देऊन ओबीसी मध्ये येण्याचं कारण काय?" असा सवालही छगन भुजबळ यांनी उपस्थित केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

"मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या. मराठा समाज ३६ टक्के मागास हे कसं ठरवलं? मला काही कळायला मार्ग नाही. गरिबी कमी करणे हा दुसरा कार्यक्रम त्याला आमचा विरोध नाही. मात्र मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागास कसा? पाटील आणि त्याच्या समोर एखादा सुतार, माळी, वंजारी आणि अन्य कोण मागास आहे? असे म्हणत जिल्हा परिषद, बँका, साखर कारखाने कुणाकडे?" असेही छगन भुजबळ म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Igatpuri Tourism : पावसाच्या सरी अन् धुक्याची चादर, इगतपुरीजवळ वसलाय निसर्गाचा अद्भुत नजारा

Ladki Bahin Yojana : लाडकीमुळे महाराष्ट्रातील ४ योजना बंद; लाभार्थी शेतकरी, ज्येष्ठ नागरिकांना बसणार फटका?

Maharashtra Live News Update: थोड्याच वेळात कर्जत- बदलापूर लोकल वाहतूक सुरू होणार

Harshada Khanvilkar : "बाप्पाचं नाव शाहरुख ठेवलंय..."; हर्षदा खानविलकरनं सांगितले खास कनेक्शन

Crime: कावड यात्रेला निघालेल्या नवऱ्याला वाटेत गाठलं, बायकोने बॉयफ्रेंडच्या मदतीने जिवंत जाळलं

SCROLL FOR NEXT