Chhagan Bhujbal News Saam tv
महाराष्ट्र

Chhagan Bhujbal News: 'ती केस आम्हीही विसरलो अन् ईडीही विसरली...' महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील याचिका मागे घेतल्यानंतर भुजबळांची प्रतिक्रिया

Maharashtra Sadan Scam: महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी ईडीने उच्च न्यायालयात केलेली याचिका मागे घेतली आहे.

Gangappa Pujari

अमर घटारे, प्रतिनिधी|ता. १२ डिसेंबर २०२३

Chhagan Bhujbal News:

महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी ईडीने उच्च न्यायालयात केलेली याचिका मागे घेतली आहे. भुजबळ आणि त्यांचा पुतण्या समीर यांच्या विरोधात दाखल याचिका मागे घेत असल्याचे सक्तवसुली ईडीने मुंबई उच्च न्यायालयात कळवले आहे. ईडीकडून दिलासा मिळाल्यानंतर छगन भुजबळांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणालेत छगन भुजबळ?

"ईडीच्या (ED) केसमधून सुटलो ही बातमी चुकीची आहे. दोन ते तीन वर्षांपूर्वी आम्हाला परदेशात जायचं होते. त्यासाठी आम्ही सेशन कोर्टामध्ये अर्ज केला होता. तेव्हा आम्हाला कोर्टाने परवानगी दिली.मात्र त्याला ईडीचा विरोध होता, तेव्हा ईडीने त्या परवानगी विरोधात अपिल केले होते. आता ती केस आम्ही पण विसरलो आणि ईडी पण विसरली..." असे भुजबळ यावेळी म्हणाले.

"आम्ही परदेशात जाऊन आलो पण त्यामुळे त्या केसला काही अर्थ राहिला नाही. जी मेन केस आहे ती पण विड्रॉल झाली पाहिजे. आम्ही महाराष्ट्र सदनच्या केसमधून सुटलो आहोत. त्यामुळे ईडीची केस आमच्याकडून काढून घेतली पाहिजे त्यासाठी आम्ही कोर्टात लढत आहे.." असेही छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सांगितले.

काय होते प्रकरण?

महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील आर्थिक गैरव्यवहारा प्रकरणी भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांना २०१६ मध्ये झाली रोजी अटकही झाली होती. तब्बल दोन वर्षांनी उच्च न्यायालयाने भुजबळांना जामीन मंजूर केला होता. कोर्टाच्या या निर्णयाला या निर्णयाला ईडीने २०१८ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.  (Latest Marathi News)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Idli Chutney Recipe: इडलीची चटणी खूप पातळं होतेय? मग ही खास स्टेप एकदा नक्की फॉलो करा

Maharashtra Live News Update: संघाच्या शताब्दी कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या हस्ते टपाल तिकीट आणि नाणं जारी

Shirur News : फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट न केल्याने भयानक कृत्य; टोळक्याचा तरुणावर जीवघेणा हल्ला

Dussehra Apatya Leaves: दसऱ्याला आपट्याची पाने वाटण्यामागे शास्त्र काय आहे?

Kalsubai Fort History: इतिहास, वास्तुकला आणि ट्रेकिंगसाठी खास! वाचा कळसुबाई किल्ल्याचा इतिहास आणि वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT