Nashik Road Accident Latest Updates : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर शिर्डी महामार्गावर आज (शुक्रवार) झालेल्या अपघातात दहा जण ठार झाले आहेत. या अपघातानंतर (Nashik Bus Accident News) राज्यासह देशातून शाेक व्यक्त हाेऊ लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर घटनेबद्दल दुख व्यक्त करीत आहे. या घटनेतील मृतांच्या वारसांसह जखमींना महाराष्ट्र सरकरासह पंतप्रधान कार्यालयाने आर्थिक मदत जाहीर केली. नाशिक जिल्ह्यात यापुर्वी देखील एक माेठा अपघात झाला हाेता. आजच्या अपघातानंतर नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी ट्विट करुन अपघातात (accident) होणारी वाढ चिंताजनक असल्याचे म्हटले आहे.
पालकमंत्री भुजबळ आपल्या ट्विटमध्ये लिहितात नाशिक शिर्डी (shirdi) महामार्गावर झालेल्या खासगी बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दहा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही बातमी अतिशय दुःखदायक आहे. या अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना तातडीने चांगले उपचार मिळावे. अपघातात मृत्यू झालेल्या नागरिकांना मदत घोषित करण्यात आलेली आहे.
ही मदत लवकरात लवकर त्यांच्या कुटुंबियांना मिळावी. रस्ते अपघातात होणारी वाढ हा अतिशय चिंतेचा विषय बनला असून यावर आता ठोस उपाययोजना करण्याची नितांत आवश्यकता आहे. या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो, असेही भुजबळ यांनी नमूद केले आहे.
दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील अपघातामधील मृतांना श्रद्धांजली वाहत जखमींना लवकर आराम मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. फडणवीस यांच्या ट्विटला रिप्लाय देताना काही नागरिकांनी, नेटीझन्स यांनी सरकार रस्ते दुरुस्तीकडे लक्ष देणार आहे की नाही असा सवाल विचारला आहे.
सूरज पाेटे यांनी पैठण पासून अहमदनगर (nagar) पर्यंतचा (94 km) रस्ता पूर्णत: खड्डेमय असल्याचे म्हटलं आहे. आत्तापर्यंत सुमार 437 लोक मृत्युमुखी पडले आहे. हा आकडा अजून जास्त असू शकतो असे नमूद करीत रस्ता दुरुस्तीकडे लक्ष वेधले आहे.
मनिष गावडे यांनी महामार्ग पोलिसांच्या बेफिकीर वृत्तीमुळे असे अपघात वारंवार घडत आहेत असा आराेप केला आहे. जड वाहने, नादुरुस्त ओव्हरलोड वाहने, लेन कटिंग, स्पीडचे वेड या सर्व नियमांकडे डोळेझाक करतात असे म्हटले आहे. पाेलिस टोलनाक्यांवर उभे राहून केवळ स्पीडमध्ये वाहनांवर कारवाई करण्याची धन्यता मानतात असे नमूद केले आहे.
धुळे मनमाड आणि मनमाड शिर्डी हा रस्ता फार खराब झालेला आहे. त्याकडे लक्ष द्या. तुम्ही ५ लाख रुपये दिले म्हणून घोषणा केली, अभिनंदन. पण गेलेले जीव परत नाही येत साहेब. नुसते चौकशीचे आदेश दिले म्हणून काही उपयोग नाही प्रत्यक्षात कार्यवाही करा हीच अपेक्षा अशी मागणी विलास पाटील यांनी केली आहे.
मदतीचा हात दिल्याबद्दल धन्यवाद पण मूळात अपघात का झाला. चाैकशी अंती संबंधितांवर ताबडतोब कारवाई करा व झालेली कारवाई पंधरा दिवसांत सर्व जनतेला कळू द्या अशी मागणी नागरिकाने उपमुख्यमंत्र्यांना केली आहे. (Maharashtra News)
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.