Chhagan Bhujbal attacks Manoj Jarange Saam Tv News
महाराष्ट्र

Chhagan Bhujbal : या जरांगेनेच एवढ्या मोठ्या...; मंत्रिपदाची शपथ घेताच छगन भुजबळांचा मनोज जरांगेवर हल्लाबोल

Chhagan Bhujbal on Jarange Patil : अजित पवार हे जातीयवादी लोकं पोसायचं काम करत आहेत, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली होती. त्यावर, भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'या जरांगेनेच एवढ्या मोठ्या चुका अन् खेळ्या केल्या आहेत.

Prashant Patil

मुंबई : राज्यातील महायुती सरकारमध्ये आणखी एका मंत्र्याचा समावेश झाला असून राजभवन येथे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा आमदार छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यापूर्वी झालेल्या महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यात छगन भुजबळ यांचं नाव वगळण्यात आल्यानं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. तर, भुजबळ यांनी देखील जाहीरपणे नाराजी बोलून दाखवली होती. मात्र, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर आता छगन भुजबळ यांची पुन्हा मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. त्यावरुन, आता पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ आमने सामने आले आहेत. भुजबळांच्या मंत्रिमंडळातील सहभागावारुन मनोज जरांगे यांनी अजित पवारांना लक्ष्य केलं. त्यानंतर, भुजबळ यांनीही जरांगेंवर प्रतिहल्ला करत जरांगेमुळेच मराठा समाजाला त्रास झाल्याचं म्हटलं आहे.

अजित पवार हे जातीयवादी लोकं पोसायचं काम करत आहेत, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली होती. त्यावर, भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'या जरांगेनेच एवढ्या मोठ्या चुका अन् खेळ्या केल्या आहेत. मनोज जरांगे यानेच सगळ्यात जास्त मराठा समाजाचं नुकसान केलं आहे, त्याच्यामुळेच गावागावात वाद लागले आहेत,' अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. तसेच, 'खरंतर मराठा समाज हा सगळ्यात मोठा बांधव म्हणून महाराष्ट्रात राहतो, पण या जरांगेच्या कर्तृत्वामुळेच निश्चितपणे मराठा समाजालाच त्रास झालाय,' असंही भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

'छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली किंवा नाही घेतली हा त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे. छगन भुजबळ मंत्री झाले याचा आम्हाला काहीच फरक पडत नाही. अजित पवार जातीयवादी लोकं पोसायचं काम करत आहेत', असं मनोज जरांगे म्हणाले. तसेच 'अजित पवार प्रचंड मोठी चूक करत आहेत. याच्या परिणामाला त्यांना सामोरx जावं लागेल', असा थेट इशारा देखील मनोज जरांगे यांनी दिला.

दरम्यान, राज्यात महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानं मंत्रिमंडळ शपथविधी सोहळ्यात अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. मात्र, महायुती सरकार मोठ्या बहुमताने पुन्हा सत्तेत आल्यानंतर भुजबळांचा पत्ता कट झाला होता. त्यामुळे भुजबळांसह ओबीसी नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. मतदारसंघात जनतेशी संवाद, समता परिषदेच्या जागोजागी सभा, मेळावे घेत भुजबळांनी त्यावेळी आपली भूमिकाही मांडली होती. छगन भुजबळांनी नाराजी व्यक्त करताना अजित पवारांनाही लक्ष्य केलं होतं. पण, अजित पवारांची साथ सोडली नव्हती, आता भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने त्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

Maharashtra Live News Update: अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT