kalyan News : कल्याणमध्ये मोठी दुर्घटना, दुसर्‍या मजल्याचा स्लॅब तळमजल्यापर्यंत कोसळला, अनेकजण अडकल्याची भीती

Kalyan Building Collapse: कल्याण पूर्वेतील सप्तशृंगी इमारतीचा दुसऱ्या मजल्याचा स्लॅब थेट तळमजल्यापर्यंत कोसळला. बचावपथक, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल असून मदतकार्य सुरू आहे.
 Kalyan Saptashrungi building slab collapse
Kalyan Saptashrungi building slab collapse Saam TV News
Published On

अभिजित देशमुख, कल्याण प्रतिनिधी

Kalyan Saptashrungi building slab collapse : मॉन्सून पूर्व पावसाच्या सरी सुरू होताच कल्याणमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळण्याची दुर्दैवी घटना घडली आहे. कल्याण पूर्वमध्ये मंगलराघो नगर परिसरातील चार मजली इमारतीमधील दुसऱ्या मजल्याचा स्लॅब तळमजल्यापर्यंत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दुर्घटना घडलेल्या इमारतीचे नाव सप्तशृंगी असं आहे. बचावपथकाने चार ते पाच जणांना वाचवले आहेत. ते सर्वजण जखमी झाले आहेत. एक वृद्ध महिला आणि अडीच वर्षांची चिमुकली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील तळमजल्यावर अडकल्याची शक्यता आहे.

 Kalyan Saptashrungi building slab collapse
Maharashtra Cabinet : भुजबळांच्या शपथविधीनंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ महत्त्वाचे निर्णय, वाचा

इमारतीचा स्लॅब कोसळल्याची माहिती मिळताच स्थानिकांनी तात्काळ अग्निशामन दल आणि बचावपथक, पालिकेला कळवले. या घटनेची माहिती मिळताच बचावपथक आणि अग्निशामन दल घटनास्थळी दाखल झाले. कल्याण डोंबिवली महापालिकेचे अधिकारीही घटनास्थळी पोहचले. ही दुर्घटना नेमकी का घडली? सप्तशृंगी इमारतीचा दुसरा मजल्याचा स्लॅब अचानक का कोसळला? याबाबत तपास करण्यात येत आहे. घटनास्थळावर पोलीसही दाखल झाले आहेत. पोलिसांकडून गर्दीवर निंयत्रण मिळवण्यात येत आहे. सध्या सप्तशृंगी इमारतीमध्ये बचावकार्य सुरू आहे. स्लॅबच्या मलब्याखाली कुणी अडकले आहे का? याचा शोध घेतला जात आहे.

 Kalyan Saptashrungi building slab collapse
Maharashtra Cabinet : फडणवीस सरकारचा मोठा धमाका, वर्षाला ७ लाख घरं बांधणार, ७० हजार कोटींचा खर्च

कल्याण पूर्व महाराष्ट्र नगर चिकणी पाडा येथे सप्तशृंगी इमारती आहे . तळ अधिक चार मजल्याचे इमारत सुमारे 40 वर्ष जुनी आहे . या इमारतीमध्ये एकूण 25 कुटुंब राहत होते . दुपारच्या सुमारास या इमारतीच्या एका बाजूचा दुसऱ्या मजल्यावरील स्लॅब कोसळला पत्त्याप्रमाणे हा स्लॅब तळमजल्यावर कोसळला . या दुर्घटनेत चार ते पाच जण ही इमारतीमध्ये अडकले होते . घटनेची माहिती मिळतात अग्निशमन विभाग आणि केडीएमसी चा पथक पोलीस प्रशासन स्थानिक लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेतली बचाव कार्य सुरू केले. या इमारतीमधून चार ते पाच जणांना बाहेर काढण्यात आले असून गंभीर जखमी असल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . तळमजल्यावरील मलगत आणखी दोन जण अडकल्याची शक्यता वर्तन येते अग्निशमन दलाकडून या जखमींना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान या घटनेमुळे कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील धोकादायक अति धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com