Maharashtra Cabinet : फडणवीस सरकारचा मोठा धमाका, वर्षाला ७ लाख घरं बांधणार, ७० हजार कोटींचा खर्च

Maharashtra Real Estate Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाने नवीन गृहनिर्माण धोरणाला मंजुरी दिली आहे. पुढील ५ वर्षांत ३५ लाख स्वस्त आणि परवडणारी घरे उभारण्यासाठी ७० हजार कोटींचा खर्च होणार.
Maharashtra Government Cabinet
Devendra FadnavisSaam Tv
Published On

New Housing Scheme Maharashtra, affordable homes Maharashtra : राज्याच्या नव्या गृहनिर्माण धोरणाला देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडून मंजूरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

नव्या गृहनिर्माण धोरणाअंतर्गत ५ वर्षांत ३५ लाख घरे बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्य सरकार ७० हजार कोटींचा खर्च करणार आहे. या नव्या गृहनिर्माण धोरणाला सरकारने मंजुरी दिली आहे. या धोरणांतर्गत स्वस्त आणि सर्वसामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या जाणार आहेत.

'माझे घर-माझे अधिकार' हे ब्रीद. 70 हजार कोटींची गुंतवणूक येणार, झोपडपट्टी पुनर्वसन ते पुनर्विकास असा सर्वांगीण कार्यक्रम. अल्प उत्पन्नधारक, ज्येष्ठ नागरिक, महिला, औद्योगिक कामगार आणि विद्यार्थी यांच्यासाठी विशिष्ट गरजांचा धोरणात प्राधान्याने विचार
Maharashtra Government Cabinet
Maharashtra Cabinet : भुजबळांच्या शपथविधीनंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ महत्त्वाचे निर्णय, वाचा

प्रत्येक नागरिकाला २०३५ पूर्वी शाश्वत, सुरक्षित व पर्यावरण स्नेही घर मिळावे याचे नियोजन या धोरणात करण्यात आले आहे. त्यासाठी झोपडपट्टी पुनर्विकास आणि नवीन गृहनिर्माण प्रकल्पांना प्राधान्य दिले जाणार आहे. यासाठी ७० हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार असून ‘महाआवास फंड’ २० हजार कोटींवर नेण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. EWS, LIG आणि MIG या घटकांना घरे देण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे.

Maharashtra Government Cabinet
Maharashtra Cabinet : भुजबळांच्या शपथविधीनंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ महत्त्वाचे निर्णय, वाचा

नव्या गृहनिर्माण धोरणामुळे गृहनिर्माण क्षेत्राला चालना मिळण्याची शक्यता आहे, तसेच रोजगार निर्मितीला मोठा हातभार लागेल. शहरी भागातील झोपडपट्टी पुनर्वसन आणि ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास यावरही भर दिला जाणार आहे. या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात समन्वय साधला जाणार आहे. दरम्यान, नव्या गृहनिर्माण धोरणाच्या

या निर्णयाचे सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातून स्वागत होत आहे. सरकारच्या या निर्णायामुळे लाखो कुटुंबांचे घराचे स्वप्न पूर्ण होण्याची आशा निर्माण झाली आहे.

Maharashtra Government Cabinet
पुण्यात MIT मध्ये दुर्घटना, हॉस्टेलमध्ये महिलेचा मृत्यू, लोणी काळभोरमध्ये हळहळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com