Chhagan bhujbal News saam tv
महाराष्ट्र

Sangli: मोठी बातमी! औरंगाबाद, उस्मानाबादनंतर आता 'या' शहराचं नाव बदलणार

Islampur Renamed As Ishwarpur: इस्लामपूर शहराचे नाव आता ईश्वरपूर होणार आहे. छगन भुजबळ यांनी ही घोषणा विधिमंडळात केली असून, मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याने प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला आहे.

Bhagyashree Kamble

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस. या अधिवेशनात राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव बदलण्याबाबत मोठी घोषणा केली आहे. इस्लामपूरचे नाव आता 'ईश्वरपूर' करण्यात येणार असून, मंत्रिमंडळाने याला मान्यता दिल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली. तसेच, हा प्रस्ताव आता अंतिम मान्यतेसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार असल्याचंही भुजबळ यांनी स्पष्ट केलंय.

अनेक वर्षांपासून होती मागणी

इस्लामपूरच्या नामांतराची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. गेल्या ४०-५० वर्षांपासून या विषयावर चर्चा सुरू होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन इस्लामपूर प्रमुख पंत सबनीस यांनी सर्वप्रथम 'इस्लामपूर'चे नामकरण 'ईश्वरपूर' करण्याची मागणी केली होती.

डिसेंबर १९८६ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी इस्लामपूरच्या यल्लमा चौकात झालेल्या जाहीर सभेत प्रथमच 'हे इस्लामपूर नव्हे, ईश्वरपूर आहे' असे विधान केले होते. त्यानंतर या मागणीला राजकीय पाठबळही मिळाले.

नामांतर प्रक्रियेचा अंतिम टप्पा

मंत्री भुजबळ यांनी विधानसभेत नामांतराबाबत माहिती दिली की, 'मंत्रिमंडळाने नामांतरास मंजुरी दिली. आता यासंदर्भातील प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आलाय. काही महिन्यांत शासनस्तरावरील कार्यवाही पूर्ण झाली की, शहराचे नामांतर होईल. अशी माहिती भुजबळांनी दिली.

त्यानंतर नगरपरिषद, विधानसभा मतदारसंघ, तालुका, जिल्हा तसेच सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालये, संस्था, उद्योग, व्यवसाय आदी सर्वत्र 'ईश्वरपूर' हे नाव वापरले जाईल, अशी माहिती भुजबळ यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tesla Cars: ५०० किमी पेक्षा अधिक रेंज देणाऱ्या टेस्लाच्या सर्वोत्तम ५ मॉडेल्स

HSL Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार नोकरी, पगार १,८०,००० रुपये, अर्ज कुठे अन् कसा करावा?

Vidhan Bhavan : विधिमंडळातील हाणामारी, जितेंद्र आव्हाडांच्या मुलीला टार्गेट; सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत | VIDEO

'मुंबई के समंदर में डुबे डुबे के मारेंगे..' राज ठाकरेंच्या ओपन चॅलेंजवर निशिकांत दुबेंची पहिली प्रतिक्रिया | MNS v/s BJP

Maharashtra Live News Update: वाटद एमआयडीसी विरोधात आज होणार शेतकऱ्यांची जनआक्रोश सभा

SCROLL FOR NEXT