Chhatrapati Sambhaji Nagar Saam TV
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhaji Nagar: दररोज दारू पिऊन पती मारहाण करायचा; जाचाला कंटाळून विवाहितेनं संपवलं जीवन

Chhatrapati Sambhaji Nagar: १४ डिसेंबरला पहाटे साडेतीन वाजता सर्वजण गाढ झोपेत असताना विवाहितेने हे टोकाचं पाऊल उचललंय. तिच्या मृत्यूमुळे संपूर्ण परिरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Ruchika Jadhav

Chhatrapati Sambhaji Nagar:

छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक बातमी समोर आलीये. पतीचे विवाहबाह्य संबंध आणि दारू पिऊन सतत होणाऱ्या मारहाणीला कंटाळून पत्नीने स्वत:चं जीवन संपवलंय. सदर घटनेबाबत मृत विवाहितेच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पती सतत त्रास देत असल्याने पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केलीये. संभाजीनगर शहरात शिवशंकर कॉलनीत ही घटना घडलीये. १४ डिसेंबरला पहाटे साडेतीन वाजता सर्वजण गाढ झोपेत असताना विवाहितेने हे टोकाचं पाऊल उचललंय. तिच्या मृत्यूमुळे संपूर्ण परिरातून हळहळ व्यक्त होत आहे.

आपल्या मुलीचं लग्न करून दिल्यावर ती सासरी सुखाने नांदावी असं प्रत्येक आई-वडिलांना वाटतं. मात्र मुलीच्या सासरी होणारा त्रास मुलीने निमुटपणे सहन केला. तिने वडिलांकडे याबाबत जास्तवेळा तक्रार केली नाही. आपली मुलगी या जगात नाही हे समजताच तिच्या वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली.

मुलीचा मृतदेह पाहून त्यांनी टाहो फोडला. आपल्या मुलीने सासरी होणाऱ्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे हे त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर या प्रकरणी मृत विवाहितेच्या वडिलांनी पती आणि सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल केली आहे. दिलेल्या तक्रारीवरून पतीसह तिघांविरुद्ध जवाहरनगर ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलका पवन मुटेकर असे मृत विवाहितेचे नाव आहे.

प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या

भंडाऱ्यात या घटनेच्या अगदी विरुद्ध घटना घडलीये. येथे एका विवाहितेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली आहे. पती प्रेमात अडथळा ठरत होता त्यामुळे पत्नीने त्याचा गळा आवळून कायमचा विषय संपवला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी पत्नीसह तिच्या प्रियकराला अटक केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saim Ayub: वनडे क्रिकेटच्या इतिहासात जे कोणालाच जमलं नाही, ते सॅम अयूबने करुन दाखवलं

Beetroot Benefits: हिवाळ्यात बीट खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Constitution Day : संविधान वर्तमान आणि भविष्याचे मार्गदर्शक; संविधान दिनी PM मोदींचा दहशतवाद्यांनाही कडक इशारा

Health Tips: हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ केल्याने मिळतात जबरदस्त फायदे; जाणून घ्या

Maharashtra Politics : मुख्यमंत्रिपदाचा पेच सुटला? भाजपकडून एकनाथ शिंदे यांना दोन ऑफर

SCROLL FOR NEXT