देशासह राज्यात सध्या हवामानात मोठे बदल होत असून, तापमानात चढ-उतार दिसून येत आहे. मुंबईसह इतर भागांत वातावरणात लक्षणीय बदल झाले आहेत. रात्रीच्या वेळेस आणि पहाटेच्या दरम्यान थंडी जाणवते, तर दिवसा प्रचंड उकाडा नागरिकांना सहन करावं लागत आहे. हवामान विभागानुसार ही स्थिती पुढील आठवडाभर कायम राहण्याची शक्यता आहे. बदलत्या हवामानाचा नागरिकांच्या आरोग्यावर थेट परिणाम होत आहे, आणि यामुळे आरोग्याच्या बाबतीत अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. नागरिकांना यासाठी सावधगिरी बाळगण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.
राज्याच्या काही भागांत किमान तापमानात वाढ झाली आहे, ज्यामुळे थंडीचा प्रभाव कमी होत असल्याचं दिसत आहे. त्याचबरोबर, दिवसा सूर्याच्या कडक उष्णतेमुळे अनेकांना असह्य होरपळ सहन करावी लागत आहे. या बदलत्या हवामानामुळे नागरिकांची अडचणी वाढत असून, हवामानातील असंतुलन त्यांच्या दैनंदिन जीवनावर प्रभाव टाकत आहे. ही परिस्थिती सध्या अनेकांसाठी त्रासदायक ठरत आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीमध्ये सांगितले की, सध्या पश्चिमी वाऱ्यांचा वेग वाढला आहे, ज्याचा सर्वाधिक प्रभाव वायव्य भारतात दिसून येत आहे. या बदलामुळे उत्तर भारतातील मैदानी भागांमध्ये गारठा कमी झाला आहे. राज्यातील वातावरणात मात्र दिवसभरात हिवाळा आणि उन्हाळा या दोन्ही ऋतूंचा अनुभव नागरिकांना विविध प्रहरांमध्ये घेता येत आहे. हवामानाची ही स्थिती काही काळासाठी कायम राहण्याची शक्यता असून, मुंबई, उपनगर, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातही हेच वातावरण दिसणार आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, दक्षिणेकडील काही राज्यांमध्ये बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि केरळमध्ये ३० जानेवारी ते १ फेब्रुवारीदरम्यान मुसळधार पाऊस होऊ शकतो, ज्यामुळे या ठिकाणी थंडी वाढेल. मंगळवारी सकाळी दिल्लीत किमान तापमान ९.०५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, तर कमाल तापमान १८.०१ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये सकाळी आणि संध्याकाळी थंडी जाणवत आहे, पण दुपारी उष्णतेमुळे नागरिकांना त्रास होत आहे. महाराष्ट्रात किमान आणि कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअस वाढ होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.