chandrashekhar bawankule saam tv
महाराष्ट्र

BJP : भाजप विधानसभा संपर्क प्रमुख मारहाण प्रकरणी २३ जणांवर गुन्हे दाखल, पक्षातूनही निलंबन

Buldhana येथील घटनेतील गुन्हे दाखल झालेल्यांना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सहा वर्षासाठी पक्षातून निलंबीत केले.

संजय जाधव

Buldhana News :

भाजपच्या विधानासभा निवडणुकांतील विजयाचा देशभरात जल्लोष साजरा होत असताना बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे भाजपच्या दोन गटात राडा झाला हाेता. या राड्यात विधानसभा प्रमुखासह (bjp leader prakash gavai) तिघांना मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी भाजपाच्या २३ पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याविरुद्ध मेहकर पोलीसांनी गंभीर स्वरूपाच्या कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. दूसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांनी या घटनेतील गुन्हे दाखल झालेल्यांना सहा वर्षासाठी पक्षातून निलंबीत केले आहे अशी माहिती भाजपातून देण्यात आली. (Maharashtra News)

या घटनेनंतर मेहकर विधानसभा प्रमुख प्रकाश गवई यांनी स्वतः पाेलीसांत तक्रार दिली आहे. त्यानूसार मेहकर पोलिसांनी २३ जणांवर (कलम १४७, १४८, १४९, ३२३, ३२४, ४२७, ५०४, ५०६ नुसार) गुन्हे दाखल केले आहेत.

फिर्यादी गवई, नवनियुक्त तालुकाध्यक्ष सारंग माळेकर, जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन वानखडे हे भाजप संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेसाठी बसले होते. त्यावेळी काहींनी कार्यालयात घुसून त्यांना लोखंडी सळई, लाथा बुक्क्यांनी मारहाण करीत साहित्यांची मोडतोड केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या घटनेचा व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाला होता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पाेलीसांनी दिलेल्या माहितीनूसार गुन्हे दाखल केलेल्या संशयितांमध्ये प्रल्हाद लष्कर, विलास लष्कर, प्रदीप इलग, चंद्रकांत अडेलकर, रोहित शेळके, शुभम खंदारकर, गोपाळ देशमुख, दीपक निकस, अक्षद दीक्षित, सीताराम ठोकळ, चेतन भांडेकर, महावीर मंजुळकर, गजू मंजुळकर, बलविर मंजुळकर,आकाश पिटकर, सुमित शिंदे, ओम पिटकर, जयकांत शिक्रे, रवी शिंदे, आकाश मोहिते, सोनू गुंजकर, शंकर गायकवाड यांचा समावेश आहे.

दरम्यान या घटनेतील गुन्हे दाखल झालेल्यांना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सहा वर्षासाठी पक्षातून निलंबीत केले आहे अशी माहिती भाजपातून देण्यात आली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT