Maharashtra Politics Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? अमित शहांच्या वक्तव्यानंतर भाजपमधून आली पहिली प्रतिक्रिया

Maharashtra Political News : महायुतीतील मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत अमित शहा यांच्या वक्तव्यानंतर भाजपमधून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

Vishal Gangurde

पराग ढोबळे, साम टीव्ही प्रतिनिधी

नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील विविध भागात सभांचा धुरळा सुरु आहे. या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. मात्र, अद्याप महायुतीकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. याचदरम्यान, अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी आघाडीवर राहणार असल्याचे संकेत दिले आहे. अमित शहा यांच्या वक्तव्यारून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अमित शहा यांच्या वक्तव्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

अमित शहा यांच्या वक्तव्यावर भाष्य करताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, 'आज महाराष्ट्रात महायुतीचे सरकार बनवण्याकरिता, जनतेच्या विकासाकरिता राज्यात यावं. डबल इंजिन सरकार महाराष्ट्राच्या जनतेचा विकास करावा आणि महाराष्ट्र देशात एक क्रमांकाचा राज्य व्हावं याकरिता नरेंद्र मोदी-अमित शहा यांनी संबोधित केलं आहे. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे भाजपचा विजय हा खऱ्या अर्थाने नेतृत्वाचा विजय असतो'.

'आमच्या जास्तीत जास्त जागा महायुती म्हणून भाजप,शिवसेना,राष्ट्रवादीच्या जागा यावा, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यामुळे या गोष्टीला दुसऱ्या अँगलमधून घेऊ नये. महायुतीचं सरकार यावं, यासाठी अमित शहा म्हटले आहेत. 'महाराष्ट्राचा महायुतीचं सरकार हे मुख्यमंत्री बनण्याच्या कुठल्याही चढाओढीमध्ये नाही. आम्ही विकासाकरिता काम करतो आहे. मुख्यमंत्रिपदासंदर्भात केंद्रीय नेतृत्व निर्णय करेल, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

भुजबळांनी एका पुस्तकात दिलेल्या वक्तव्यावर भाष्य करताना बावनकुळे म्हणाले, आज मी छगन भुजबळांसोबत होतो. त्यांनी व्यक्तिगतही मला असं सांगितलं की, मी असं कुठेही बोललो नाही. त्यांनी मला व्यक्तिगत सांगितलं की, सर्व काही खोटं आहे. मी कुठेही असं बोललो नाही. माझा कुठे गैरवापर करणे, असं योग्य नाही. भुजबळ हे कायदेशीर कारवाई करतील असं दिसत आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha Exit Poll: वर्ध्यात भाजपचे पंकज भोयर तिसऱ्यांदा होणार आमदार? पाहा Exit Poll

Maval Exit Poll Result : बंडखोर की विद्यामान, मावळची जनता कुणाच्या मागे? एक्झिट पोलचा अंदाज काय?

Pension: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ८ दिवसांत हे काम करा, नाहीतर पेन्शन विसरा

Gautami Patil : गौतमी पाटील,अलका कुबल अन् सई ताम्हणकर स्क्रिनवर एकत्र झळकणार? 'तो' व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

Bandra East Exit Poll: वांद्रे पूर्व मतदारसंघातून वरुण सरदेसाई आमदार होणार का? पाहा Exit Poll

SCROLL FOR NEXT