मुंबई: मुंबई महानगरपालिकेतील (BMC) प्रभाग रचनेचा मुद्दा भाजपने पुन्हा एकदा उकरुन काढला आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत. मविआ सरकारच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ठाकरे सरकारने मुंबई महापालिकेच्या हद्दीतील सर्व प्रभागांची रचना बदलली होती, मात्र भाजपकडून तेव्हा याला विरोध करण्यात आला होता. आता बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर भाजपने प्रभाग रचनेबाबत पुन्हा मागणी केली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचना झाल्या, त्यात अधिकाऱ्यांवर दबाव आणून नियमबाह्य पद्धतीने प्रभाग रचनेत बदल करवून घेतले असा आरोप करत त्याशिवाय कुठलीही निवडणुक घेऊ नये अशी मागणी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. (BMC Ward Formation News)
हे देखील पाहा -
भाजपचे नेते मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचनेबाबत अंतिम अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये आता २२७ ऐवजी २३६ वॉर्ड असणार आहेत. या अधिसूचनेत वॉर्डच्या नवीन सीमा जाहीर करण्यात आल्या आहेत. यावर आता भाजपने (BJP) आक्षेप घेतला आहे. भाजप नेते चंद्रशेखर बावकनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले की, महाविकास आघाडीने केलेल्या प्रभाग रचना , गन रचना या सदोष आहे त्यामुळे त्या रद्द करून नव्याने प्रभाग रचना कराव्यात. नव्या प्रभाग रचनेबाबत हजारो हरकती आल्या पण, महाविकास आघाडीचे उमेदवार कसे निवडून येणार याचा प्रयत्न केला गेला असाही आरोप बावनकुळेंनी केला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले की, आम्ही निवडणूक आयोगाला पत्र लिहून प्रभाग रचना तपासून पुन्हा रचना कराव्या अशी मागणी केली. तसेच नव्या प्रभाग रचना झाल्याशिवाय कुठलीही निवडणूक घेऊ नये आणि आयोगाने तातडीने या प्रभाग रचना रद्द कराव्या अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी आहे. मुंबई, ठाणे, पुणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मीरा-भाईंदर, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर येथे महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.