उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का; केडीएमसीतील ५५ हून अधिक नगरसेवक शिंदे गटात!

Kalyan-Dombivali Municipal Corporation News : ठाण्यातील शिवसेनेचे ६६ नगरसेवक तर नवी मुंबईतील शिवसेनेचे ३० नगरसेवक शिंदे गटात सामील झाले होते.
Eknath Shinde Latest News, Shiv Sena news Update, Uddhav Thackeray News, Latest Marathi News, KDMC News Today
Eknath Shinde Latest News, Shiv Sena news Update, Uddhav Thackeray News, Latest Marathi News, KDMC News Todayfacebook/@DrShrikantEknathShinde
Published On

मुंबई: राज्यात सत्तापालट झाल्यापासून शिंदे गटात अनेक आमदार सामील झाले आहेत. शिवाय अजून काही खासदार आमच्या संपर्कात असून ते देखील शिंदे (Eknath Shinde) गटात सामील होणार असल्याचं शिंदे गटाकडून सांगण्यात येत आहे. एकीकडे शिवसेनेत (Shivsena) पडलेली मोठी फूट आणि भाजपने शिंदे यांना दिलेलं मुख्यमंत्रीपदामुळे शिंदे गटाची ताकद वाढली आहे. त्यामुळेच अनेक नगरसेवक, पदाधिकारी शिंदे गटात सामील होत आहेत. ठाण्यातील शिवसेनेचे ६६ नगरसेवक तर नवी मुंबईतील शिवसेनेचे ३० नगरसेवक शिंदे गटात सामील झाले होते. आता कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील (KDMC) ५५ पेक्षा जास्त नगरसेवक हे शिंदे गटात सामील झाले आहेत, त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. (Eknath Shinde Latest News)

हे देखील पाहा -

एकेकाळचे कट्टर शिवसैनिक असेलल्या एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदवरुन पायउतार होण्यास भाग पाडलं आणि शिंदे स्वतः मुख्यमंत्री झाले. आता स्थानिक पातळीवरही शिवसेनेची कोंडी करण्याचा डाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आखला आहे. गुरुवारी एकनाथ शिंदे यांनी रात्री कल्याण-डोंबिवलीमधील महानगरपालिकेतील नगरसेवकांची भेट घेतली होती. त्यानंतर केडीएमसीचे ५५ पेक्षा जास्त नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत. विशेष म्हणजे डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे सुद्धा शिंदे गटात सामील झाले आहेत. एकनाथ शिंदेंचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.

नवी मुंबईतील जवळपास ३० नगरसेवक शिंदे गटात

नवी मुंबईतील (Navi Mumbai) जवळपास ३० नगरसेवक शिंदे गटात सामील होणार असल्याची माहिती समोर येत असून हे नगरसेवक आज रात्री मुंबईत घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट. या नगरसेवकांमध्ये ऐरोली विधानसभेतील २० आणि बेलापूर विधानसभेतील १० असे एकूण 30 नगरसेवक मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे ठाण्यानंतर आता नवी मुंबईतही शिवसेनेला पडणार खिंडार पडणार असल्याचं बोललं जात आहे. (Latest Marathi News)

Eknath Shinde Latest News, Shiv Sena news Update, Uddhav Thackeray News, Latest Marathi News, KDMC News Today
धनुष्यबाण गेला तर नवं चिन्ह घरोघरी पोहोचवण्याची तयारी ठेवा; उद्धव ठाकरेंचं आवाहन

ठाणे महानगरपालिकेतील ६६ नगरसेवक शिंदे गटात

ठाणे महानगरपालिकेतील ६७ नगरसेवकांपैकी ६६ नगरसेवकांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर हे ६६ नगररसेवक हे शिंदे गटात सहभागी झाले आहे. यामध्ये माजी महापौर नरेश मस्के समवेत या नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे आता सत्ताकेंद्र बदलल्यामुळे आणि शिंदे गटाची ताकद वाढल्यामुळे शिवसेनेतील होणारी नगरसेवकांची गळती ही उद्धव ठाकरेंसाठी मोठी डोकेदु:खी ठरत आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com