Chandrashekhar Bawankule On Balasaheb Thorat
Chandrashekhar Bawankule On Balasaheb Thorat saam tv
महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule : 'थोरात मोठे नेते, त्यांना भाजपमध्ये योग्य सन्मान दिला जाईल', चंद्रशेखर बावनकुळेंची खुली ऑफर

Chandrakant Jagtap

>>सुशांत सावंत

Chandrashekhar Bawankule On Balasaheb Thorat: बाळासाहेब थोरात भाजपमध्ये येणार असतील तर त्यांचं स्वागतच आहे, अशी खुली ऑफर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बाळासाहेब थोरात हे भाजपमध्ये येणार असतील तर त्यांचे स्वागतच आहे. त्यांनी राजीनामा का दिला हे माहीत नाही. बाळासाहेबांसारखे नेते दुखावत असतील तर काँग्रेसला आत्मचिंतन करण्याची गरज आहे असा सल्लाही यावेळी बावनकुळेंनी दिला.

थोरातांविषयी बोलताना बावनकुळे म्हणाले की, बाळासाहेब थोरात एवढे लहान नेते नाहीत की त्यांना ऑफर दिली तर येतील. त्यांना आम्ही कुठलीही ऑफर देणार नाही. कुणालाही भाजपमध्ये यायचे असेल तर त्यांच्यासाठी दरवाजे उघडे असतील आणि त्यांना योग्य सन्मान दिला जाईल. थोरातांची उंची मोठी आहे, त्यांना भाजपमध्ये यायचे असेल तर योग्य सन्मान देण्यात येईल असे बावनकुळे म्हणाले.

निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन

राज्यात निवडणुका होऊ नये असे वाटत असेल तर, ही निवडणूक बिनविरोध करावी असे मी सांगितले. आताही मी विनंती करतो की त्यांनी अर्ज मागे घ्यावे. अंधेरीचा उमेदवार भाजपने मागे घ्यावा असे शरद पवार म्हणाले होते, त्यानंतर आम्ही आमचा उमेदवार मागे घेतला. आता राज्यात निवडणुका होणार नसतील तर आम्ही टिळक यांना उमेदवारी देऊ असे बावनकुळे म्हणाले.

आमचा विजय नक्की - बावनकुळे

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना काटे यांना उमेदवार घोषित करण्यात आली आहे. यावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, निवडणूक सोपी झाली की नाही हे जनता ठरवेल. अश्विनी जगताप यांना समर्थन देण्यासाठी लोक समोर येत आहेत.आमचा विजय नक्की होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News: भरधाव पिकअप अनियंत्रित होऊन टेम्पोला धडकला; भीषण अपघातात ९ जणांचा जागीच मृत्यू, थरारक VIDEO

Tulsi Vastu Tips: सकाळी तुळशीला पाणी घालण्याची योग्य वेळ काय?

Today's Marathi News Live : महाविकास आघाडीची उद्या सेनाभवनमध्ये संविधान वाचवा सभा

Israel-Hamas War: इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Maharashtra Election: महायुतीमध्ये जागावाटपाचा पेच कायम; ठाणे मतदारसंघ कुणाच्या पारड्यात, आज घोषणा होणार?

SCROLL FOR NEXT