सात वर्षात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संपत्तीमध्ये तब्बल 'इतक्या' टक्क्यांनी वाढ Saam Tv
महाराष्ट्र

सात वर्षात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संपत्तीमध्ये तब्बल 'इतक्या' टक्क्यांनी वाढ

2014 ते 2019 या काळात बावनकुळे हे राज्याचे ऊर्जामंत्री आणि उत्पादन शुल्क मंत्री होते.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर - विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप कडून पक्षाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी अर्ज दाखल केला. 2014 मध्ये बावनकुळे यांनी कामठी मतदार संघातून निवडणूक लढविली होती. 2014 ते 2021 या सात वर्षांच्या काळात बावनकुळे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या संपत्ती मध्ये तब्बल 363 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2014 साली बावनकुळे यांच्या पत्नी, त्यांचा मुलगा, मुलगी मिळून 7 कोटी 49 लाख 93 हजार रुपयांची संपत्ती होती. त्यात 65 लाख 35 हजार रुपयांची चल संपत्ती तर 6 लाख 94 लाख रुपयांच्या अचल संपत्तीचा समावेश आहे.

हे देखील पहा -

2014 ते 2019 या काळात बावनकुळे हे राज्याचे ऊर्जामंत्री आणि उत्पादन शुल्क मंत्री होते. सोमवारी त्यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीचा अर्ज भरला. त्यात त्यांनी शपथपत्रात संपत्तीचे विस्तृत विवरण दिले. त्यानुसार बावनकुळे आणि त्यांच्या पत्नीच्या नावे 90 लाखाहून अधिक अचल संपत्ती आहे. 33 कोटी 84 लाख 73 हजार रुपयांची चल संपत्ती आहे. यात जमीन, घर आणि वाणिज्य संपत्तीचा देखील समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

SCROLL FOR NEXT