चंद्रपूर: आणखी एका ST कर्मचाऱ्याने विष प्राशन करून संपवले जीवन...
चंद्रपूर: आणखी एका ST कर्मचाऱ्याने विष प्राशन करून संपवले जीवन... संजय तुमराम
महाराष्ट्र

चंद्रपूर: आणखी एका ST कर्मचाऱ्याने विष प्राशन करून संपवले जीवन...

संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर

संजय तुमराम

चंद्रपूर : आणखी एका ST कर्मचाऱ्याने जीवन संपवले. हा कर्मचारी ब्रम्हपुरी ST आगारात वाहतूक नियंत्रक असून ही घटना आज उघडकीस आली. सत्यजित ठाकूर असे त्याचे नाव आहे. ब्रह्मपुरी शहरातील राहत्या रूमवर विष प्राशन करून त्याने आत्महत्या केली. गेले 3 दिवस कुणालाही तो भेटला नव्हता. आज अचानक शेजा-यांनी दार ठोठावल्यावर प्रतिसाद मिळाला नसल्याने दार तोडले असता घटना समोर आली. संप आणि राज्य सेवेत विलीनीकरणाच्या मागणीसाठी ST कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. अत्यल्प वेतानामुळे कर्मचारी त्रस्त आहेत.

हे देखील पहा-

एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी संप पुकारला आहे. परंतु आत्महत्येच्या या घटनेनं संताप व्यक्त केला जात आहे. मागण्या पूर्ण होत नाहीत, शेवटी जगायचं तरी कस? या प्रश्नामुळे अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

आत्महत्या केलेला कर्मचारी सत्यजित ठाकूर यांचे वय ३४ वर्ष होते. त्यांना आणि चार महिन्यांची मुलगी देखील आहे. त्यांची पत्नी नागपूरला Nagpur राहते. दोनच दिवसांपूर्वी ते ब्रह्मपुरीला आले होते पण त्यांचा फोन स्वीच ऑफ Switch Off लागल्यानंतर पत्नीला शंका आली. त्यानंतर पत्नीने त्यांच्या सहकाऱ्यांना कॉल केले. तेव्हा घरी जाऊन पाहिले असता हा प्रकार समोर आला आहे.


Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weekly Rashi Bhavishya In Marathi 2024 : या ४ राशींवर बरसेल लक्ष्मीची कृपा, आरोग्याची काळजी घ्या

Today's Marathi News Live : नांदेडचा पारा पुन्हा वाढला, 41.02 कमाल तापमानाची नोंद

Bajaj ची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर येतेय! जबरदस्त फीचर्ससह किती मिळेल रेंज, जाणून घ्या

Kotak Mahindra Bank : कोटक महिंद्रा बँकेचे 'बुरे दिन' सुरु; दोन दिवसांत 47000 कोटी रुपयांचं नुकसान, १३ टक्क्यांनी शेअरची घसरण

Actress: 'तुम हुस्न परी' उर्मिलाच्या सौंदर्याने चाहते घायाळ

SCROLL FOR NEXT