माजी सरपंचाचा 'कार'नामा! गाडी भाड्याने देण्याचे आमिष दाखवून केल्या 55 गाड्या गायब

पुणे जिल्ह्यातुन 500 पेक्षा जास्त गाड्या लंपास केल्याचा अंदाज...
माजी सरपंचाचा 'कार'नामा! गाडी भाड्याने देण्याचे आमिष दाखवून केल्या 55 गाड्या गायब
माजी सरपंचाचा 'कार'नामा! गाडी भाड्याने देण्याचे आमिष दाखवून केल्या 55 गाड्या गायबरोहिदास गाडगे

रोहिदास गाडगे

पुणे: फसवणुक कधी, कोण आणि कशी करेल याचा नेमच नाही! पुण्याच्या ग्रामीण भागातील लोकांना गाड्या भाड्याने लावण्याचं आमिष दाखवुन गाड्या विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात pune घडला आहे.

हे देखील पहा-

500 पेक्षा जास्त गाड्या लंपास केल्याचा अंदाज;

स्वतःच्या वापरासाठी घेतलेल्या या आलिशान गाड्या जास्त भाडे मिळण्याच्या लालसेपोटी गाडी मालकांनी गाड्या भाड्याने देण्यास सुरुवात केली. लोकांची लालसा लक्षात घेत आरोपी सागर साबळे यांने पुणे जिल्ह्यातुन 500 पेक्षा जास्त गाड्या लंपास केल्याचा अंदाज व्यक्त केला जात असुन भोसरी, राजगुरुनगर, दौंड तालुक्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भोसरी पोलीसांनी 20 तर राजगुरुनगर पोलीस 23 गाड्या जप्त केल्या असुन राजगुरुनगर पोलीसांची दोन पथके बीड जिल्हयात पथके रवाना केली आहेत..

आलिशान गाड्यांची परस्पर बीड जिल्ह्यात विक्री;

आरोपी सागर साबळे हा खेड तालुक्यातील साबळेवाडी गावचा माजी सरपंच असल्याने राजकिय पाश्वभुमीवरचा फायदा घेऊन ग्रामीण भागासह शहरीभागातील नागरिकांना जास्त भाड्याचे आमिष दाखवत औरंगाबाद आणि हिंजवडी आयटी पार्कमध्ये गाड्या भाड्याने लावुन महिन्याला 25 ते 30 हजार रुपये भाडे मिळेल असे आमिष दाखवून अनेकांच्या गाड्या ताब्यात घेऊन या अलिशान गाड्या परस्पर बीड जिल्ह्यात विक्री केल्या. यामध्ये गाडी मालकांसह गाड्या खरेदी करण्यांचीही फसवणुक झाली आहे.

माजी सरपंचाचा 'कार'नामा! गाडी भाड्याने देण्याचे आमिष दाखवून केल्या 55 गाड्या गायब
धक्कादायक! 5 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; रोह्यातील घटना

गाडी व्यवसायातुन चांगलं उत्पन्न मिळेल या आशेपोटी अनेकांनी आलिशान गाड्या खरेदी केल्या, या गाड्यांवर बँका, फायनान्स कंपन्यांचे कर्ज घेतले, या गाड्यांसाठी ड्रायव्हरची व्यवस्था साबळे हाच पाहणार होता. परिणामी गाडी प्रत्यक्षात कुठे वापरली जाणार याबाबत मालक अनभिज्ञ होते. अशातच सहा महिने उलटुनही भाडे मिळत नसल्याने आपली फसवणुक झाल्याचे नागरिकांच्या लक्षात आलं मात्र वेळ निघुन गेली होती पोलीस आता या गाड्यांचा शोध घेत आहे 

पैसा आणि व्यवसायिक भाडे याच्या मिळणार लालसेपोटी अनेक गंडा घालणार सागर साबळे पोलीसांच्या ताब्यात आहे. लालसेपोटी लोकांची झालेली फिसवणुक अनेकांना धडा शिकवणारी आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com