Pratibha Dhanorkar News Today Saam TV
महाराष्ट्र

Pratibha Dhanorkar: पक्षातील विरोधामुळेच माझ्या पतीचा जीव गेलाय; आमदार प्रतिभा धानोरकरांच्या आरोपाने खळबळ

Chandrapur Politics News: माझ्या पक्षातील काही लोकच माझ्या विरोधात असून त्यांच्या याच विरोधाने माझ्या पतीचा जीव घेतलाय. आता ते माझ्या मागे लागले आहेत, असे वक्तव्य काँग्रेस आमदार प्रतिभा धानोरकर यांनी माध्यमांशी बोलताना केलं.

Satish Daud

संजय तुमराम, साम टीव्ही चंद्रपूर

Pratibha Dhanorkar News Today

माझ्या पक्षातील काही लोकच माझ्या विरोधात असून त्यांच्या याच विरोधाने माझ्या पतीचा जीव घेतलाय. आता ते माझ्या मागे लागले आहेत, असे वक्तव्य काँग्रेसचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी माध्यमांशी बोलताना केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातू मोठी खळबळ उडाली आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विरोधामुळे एक जीव गेला आता दुसरा जीव जाणार नाही, याची काळजी मी घेईन, असंही प्रतिभा धानोरकर यांनी ठणकावून सांगितलं आहे. त्या चंद्रपुरातील एका कार्यक्रमात बोलत होत्या. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या आमदार प्रतिभा धानोरकर भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

या चर्चांना देखील प्रतिभा धानोरकर यांनी पूर्णविराम दिला आहे. माझ्यावर आरोप करणारे नेते स्वतः भाजपमध्ये जाणार आहेत. मात्र, अफवा माझ्याबद्दल पसरवल्या जात आहेत. मी कुठेही जाणार नसून काँग्रेसच्याच तिकिटावर लोकसभा लढवणार आहे, असं प्रतिभा धानोरकर यांनी स्पष्ट केलं आहे. (Latest Marathi News)

खासदार साहेब गेले तेव्हापासून पक्षातील काही लोकच माझा विरोध करीत आहेत. या विरोधामुळेच माझ्या पतीचा त्यांनी जीव घेतलाय. आता ते माझ्या मागे लागले असून एक जीव गेला मात्र मी दुसरा जीव जाऊ देणार नाही, असंही प्रतिभा धानोरकर यांनी म्हटलं आहे.

चंद्रपूर येथून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेस प्रभारी चेंनिथला यांच्यासोबत मतदारसंघाबाबत चर्चा करण्यात आली, मात्र त्यांनी कुठलंच आश्वासन दिलं नाही. काँग्रेसमध्ये वेळेपर्यंत कुठला निर्णय होत नाही. मला कुठले निर्देश नसले तरी माझी तयारी सुरू आहे, असंही धानोरकर म्हणाल्या.

मला लोकसभा निवडणूक लढवायची आहे, अशी प्रतिक्रिया देतानाच आमच्या पक्षात भाजपच्या पे-रोलवर चालणारे काही लोकं आहेत, अशी जहरी टीका आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केली. तिकीट मागण्याचा प्रत्येकाला अधिकार असून शिवानी वडेट्टीवार काही माझी प्रतिस्पर्धी नाही. कोणी दिल्लीला शिष्टमंडळ नेल्याने तिकीट मिळत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Celebrity Health: वाढदिवसाच्या दिवशी प्रसिद्ध दिग्दर्शकाला हार्ट अटॅक? रुग्णालयात दाखल; नेमकं सत्य काय?

Ahilyanagar road Accident : अहिल्यानगरमध्ये भीषण अपघात; ५ जण जागीच ठार, मृतांमध्ये २ लहान मुलांचा समावेश

मुंबईत सत्ताधारी आणि विरोधकांकडून स्वीकृत नगरसेवकांच्या नावांची घोषणा; कुणाला मिळाली संधी? VIDEO

Maharashtra Live News Update: अहिल्या नगर जिह्यातील श्रीरामपूर - संगमनेर रस्त्यावर भीषण अपघात...

भिगवणमधील तरुणी आईकडे परतणार? कोर्टात जबाब बदलला, अचानक नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT