Chandrapur News Saam Digital
महाराष्ट्र

Chandrapur News: विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर तणाव, मुख्याध्यापकाला ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी दिला चोप

Chandrapur News: चंद्रपुरात सामाजिक न्याय विभागाअंतर्गत येणाऱ्या अनुदानीत खाजगी जिजामाता निवासी आश्रमशाळेत विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर तणाव निर्माण झाला आहे. सहा दिवसांपासून या विद्यार्थिनीची प्रकृती बिघडल्याचे मुख्याध्यापकाने लपवले होते.

Sandeep Gawade

Chandrapur News

चंद्रपुरात सामाजिक न्याय विभागाअंतर्गत येणाऱ्या अनुदानीत खाजगी जिजामाता निवासी आश्रमशाळेत विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर तणाव निर्माण झाला आहे. सहा दिवसांपासून या विद्यार्थिनीची प्रकृती बिघडल्याचे लपवणाऱ्या मुख्याध्यापकाला शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालय परिसरात चोप दिला आहे.

मूल तालुक्यातील सुशी दाबगाव येथे ही निवासी आश्रमशाळा आहे. अहेरी येथील मितल कोंडगुर्ले हिची प्रकृती खालावली असताना सहा दिवसांपासून पालकांना याची सूचनाच दिली नसल्याचे उघड झाले. अखेर रुग्णालयात तिचा मृत्यू झाल्यानंतर पालकांना माहिती दिल्यावर त्यांना धक्का बसला. रुग्णालयात दाखल असल्याचे व उपचार सुरू असल्याचा खोटा निरोप दिल्याने पालक भडकले. प्रकरणाची माहिती मिळताच शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आश्रमशाळा व्यवस्थापनाला जाब विचारला. आश्रमशाळेची मान्यता तातडीने रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: केस ड्राय-फ्रिजी झालेत? मग सॉफ्ट केसांसाठी आठवड्यातून १ वेळा लावा हा घरी तयार केलेला हेअर मास्क

Perfume Hack : परफ्युमचा सुगंध उडतो? ९९% लोकांना माहितीच नाही

Satara News: शेळीला वाचवताना भयंकर घडलं, विजेचा धक्का लागून आजी अन् नातवाचा तडफडून मृत्यू

Maharashtra News Live Update: धुळे जिल्ह्यात पावसाअभावी धुळ्यात खरीप पेरण्या मंदावल्या; केवळ २५ टक्के पेरणी

FDA Action: 904 धाडी, 34.66 कोटींचा मुद्देमाल जप्त; महिन्याभरात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर धडक कारवाई

SCROLL FOR NEXT