नागपूर जिल्ह्यातील सावनेर शहरातील बाजार ओळीतील दरोडेखोडांनी एटीएम गॅस कटरने फोडून 10 लाख 30 हजार रुपये लांबविल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कारमधून आलेल्या चार ते पाच जणांनी हातात शस्त्र घेऊन एसबीआयच्या एटीएमवर दडोडा टाकला आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद कैद झाली आहे. एसबीआयने रात्रीच कॅश टाकली होती, त्यामुळे त्यामुळे रेकी करून दरोडा टाकल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. दरम्यान बसस्थानक चौकातील एचडीएफसी बँकेचं एटीएम फोडताना सायरन वाजल्यानं दरोडेखोरांनी तेथून पळ काढल्याची माहिती आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पिंपरी चिंचवड शाखेने गोवा पोलिसांच्या सहाय्याने राज्यात जाऊन बनावट दारू बनवणारा कारखाना उध्वस्त केला आहे. तसेच गोवा राज्यातून महाराष्ट्रात अवैधरीत्या बनावट देशी दारूची तस्करी करणाऱ्या ट्रकवर देखील राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पिंपरी चिंचवड शहरातील मामुर्डी या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने बनावट देशी दारूची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई केली आहे. या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाने एका ट्रकमधील ९० मिलीलिटरच्या ६० हजार बाटल्या जप्त केल्या आहेत.
मुंबई पोलिसांनी बनावट वैद्यकीय कागदपत्रे (Fake Medical Reports Racket) बनवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय. याप्रकरणी एका वॉर्ड बॉयसह चार आरोपींना अटक केली आहे. आरोपी इंजेक्शन देऊन लोकांची बोटे मोडायचा आणि नंतर रुग्णाला डॉक्टरकडे पाठवून बनावट वैद्यकीय अहवाल बनवायचा. त्यानंतर या वैद्यकीय अहवालांच्या आधारे पोलिसांत तक्रार करायचे, अशी माहिती पोलिसांनी दिलीय.
बनावट वैद्यकीय कागदपत्रे बनवणाऱ्या रॅकेटचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी सिव्हिल हॉस्पिटलच्या वॉर्ड बॉयसह चौघांना अटक केली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.