Nashik Crime : मालकाने गाडीत ठेवलेले ३ लाख घेऊन चालक फरार; भद्रकाली पोलिसांकडून चालकाला अटक

Nashik News : रक्कम पाहून चालक प्रशांत गवळी याची नजर फिरली. प्रशांत गवळी याने ही रक्कम घेऊन नाशिकमधून धूम ठोकली.
Nashik Crime
Nashik CrimeSaam tv
Published On

तबरेज शेख 
नाशिक
: कामानिमित्ताने कारने जिल्हा परिषदेत आले. सोबत आणलेली रक्कम जवळ बाळगण्याऐवजी चालकाच्या (Nashik) भरवशावर गाडीतच राहू दिली. मात्र चालकाने आपल्या मालकाचा विश्वासघात करत गाडीतील रक्कम घेऊन पसार झाला. मालकाने याबाबत पोलिसात (Police) तक्रार दिल्याने पोलिसांनी रक्कम घेऊन फरार झालेल्या चालकाला ताब्यात घेतले आहे.  (Latest Marathi News)

Nashik Crime
Parali Accident : बोअरच्या गाडीचा विद्युत तारांना स्पर्श; दोन कामगारांचा मृत्यू, २ जण जखमी

गणपत सुखदेव हडपे हे जिल्हा परिषदेमध्ये एका कामाच्या निमित्ताने कारने आले होते. यावेळेला चालक प्रशांत गवळी हे त्यांची कार चालवत होते. याच दरम्यान हडपे यांनी काही रक्कम आपल्या सोबत आणली होती. इतकी रक्कम जिल्हा परिषदेत घेऊन जाण्याऐवजी त्यांनी गाडीच्या ड्रावरमध्ये ठेवली. ही रक्कम पाहून चालक प्रशांत गवळी याची नजर फिरली. प्रशांत गवळी याने ही रक्कम घेऊन (Nashik Police) नाशिकमधून धूम ठोकली. काम आटोपून हडपे हे गाडीजवळ आले असता चालक नसल्याचं त्यांच्या लक्षात आले. त्यांनी फोन केला असता संपर्क होऊ शकला नाही. त्यांनी तात्काळ आपल्या (Crime News) गाडीच्या डेस्टबोर्ड ठेवलेले पैसे शोधले असता रक्कम देखील मिळून आली नाही. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nashik Crime
Kapil Patil News : सगळ्यांना सोबत घेऊन एकत्र काम करा; केंद्रीय मंत्री कपील पाटील यांचे शिवसेना आमदार भोईर यांना आवाहन

यानंतर लागलीच भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करत मदतीची मागणी केली. भद्रकाली पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लागलीच गुन्हा दाखल करून घेत तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर एका आठवड्याच्या आत आरोपी प्रशांत गवळीला भद्रकाली पोलिसांनी बेड्या ठोकल्या. यासाठी प्रशांत गवळीनं नाशिकसह थेट हिंगोली गाठल्याचं पोलीस तपासात समोर आले. गवळी याने ३ लाख रक्कमेत निम्म्याहून अधिक रक्कम उधळल्याचं पोलीस तपासात समोर आले. गवळीकडुन १ लाख ७० हजार रुपये रोख आणि १२ हजार ५०० रुपयांचा मोबाईल असा एकूण १ लाख ८२ हजार ५००  रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. भद्राकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील, पोलिस निरीक्षक संतोष नरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे एपीआय सत्यवान पवार, पोलीस निरीक्षक रमेश शिंदे यांचे पथकातील कर्मचाऱ्यांनी गुन्हा उघडकीस आणले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com