बीड : बोअरिंग करण्यासाठी जात असलेल्या बोअरच्या गाडीचा विद्युत वाहक तारांना स्पर्श झाल्याने गाडीवरील २ कामगारांचा जागीच (Death) मृत्यू झाला. तर अन्य २ कामगार जखमी झाले आहेत. या अपघाताचा थरार (Beed) बीडच्या परळी शहराजवळ दुपारच्या सुमारास घडला. (Maharashtra News)
सदरची घटना परळी (Parali) शहरालगत घडली असून जखमींवर परळी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेत गोविंदा धवन सिंग व संदीप (रा. ओडिसा) मृत झालेल्या कामगारांचे नाव आहे. हे कामगार परळी शहरालगत असणाऱ्या वाघबेट येथे पाण्याचा बोअर करण्यासाठी आले होते. सकाळी बोअरिंगच्या कामाला सुरवात झाली. काम आटोपल्यानंतर गाडी मार्गस्थ झाली होती.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
परिसरात धावपळ
बोअर करण्याचे काम झाल्यानंतर गाडी परळी शहराकडे जाण्यासाठी मार्गस्थ झाली होती. परळी शहर काही अंतरावर असताना हा थरारक (Accident) अपघात झाला. अपघात झाल्याने परिसरात असलेल्या नागरिकांची धावपळ सुरु झाली होती. दरम्यान या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.