चिमठाणे (धुळे) : म्हळसर (ता.शिंदखेडा) येथील शासकीय प्राथमिक आश्रमशाळा कॅम्प सुलवाडे (ता. शिंदखेडा) येथे शालेय पोषण आहारा करिता (Dhule) भाजीपाला पुरवठा करण्याचे कंत्राट महिला बचत गटास देण्यात आले होते. भाजीपाला पुरवठ्याचे देयक मंजूर करून देण्याचा मोबदला म्हणून २० हजाराची मागणी करण्यात आली. तडजोडीअंती ठरलेली १२ हजाराची लाच (Bribe) स्वीकारताना मुख्याद्यापक व अधीक्षकास एसीबीने ताब्यात घेतले. (Tajya Batmya)
अक्कलकोस (ता.शिंदखेडा) येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेच्या (Ashram School) मुख्याध्यापिका अर्चना जगताप यांना चार हजार रुपायांची लाच घेताना धुळे विभागाच्या लाचलुचपत विभागाने (Dhule ACB) अटक केल्याची घटना नुकताच घडली होती. यानंतर पुन्हा म्हळसर येथील शासकीय प्राथमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक प्रदीपकुमार वामनराव राठोड (वय ३४, रा. विद्या कॉलनी, स्वामिनारायण मंदिरा मागे दोंडाईचा ता. शिंदखेडा) व कार्यालय अधीक्षक हनुक फुलसिंग भादले (वय ४७, रा. साईबाबा अपार्टमेंट मांडळ शिवार, शिरपूर) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यात अधीक्षक हनुक भादले यांनी पंचांसमक्ष लाच स्वीकारली.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
भाजीपाला पुरवठा करण्यासाठीचे मागील नऊ महिन्याचे देयक मंजूर करून दिले होते. त्याचा मोबदला म्हणून तसेच उर्वरित दोन महिन्याचे पुढील देयक अदा करण्यास मदत करण्यासाठी मुख्याध्यापक व कार्यालय अधीक्षक यांनी २० हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडी अंती १२ हजार रुपयांची रक्कम देण्याचे ठरले होते. सदरची लाच स्वीकारताना कार्यालय अधिक्षकास २९ जानेवारीला दुपारी धुळे येथील लाचलुचपत विभागाच्या उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या पथकाने पकडले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.