Chandrapur Crime Saam tv
महाराष्ट्र

Chandrapur Crime: पोलीसच निघाला चोर; कर्ज फेडण्यासाठी पत्करला घरफोडीचा मार्ग

Chandrapur News : शेअर बाजारात सतत फटका बसत असल्याने त्याच्यावर २२ लाख रुपयांचे कर्ज झाले. हे कर्ज फेडण्यासाठी त्याने घरफोडीचा मार्ग पत्करला.

संजय तुमराम

चंद्रपूर : पोलीस प्रशासनाच्या भरवश्यावर सामान्य नागरिकाला सुरक्षित राहण्याचा विश्वास असतो. अर्थात ज्या (police) पोलिसांवर सर्वसामान्य माणूस रक्षणाची भिस्त ठेवतो, त्याच (Chandrapur) पोलिसांकडून ही रक्षणाची भिंत तोडल्याचा प्रकार समोर आला आहे. एका पोलिसाने चक्क घरफोड्या केल्याची धक्कादायक घटना चंद्रपुरात समोर आली आहे. (Tajya Batmya)

चंद्रपूरच्या स्थानिक गुन्हे शाखेत नरेश डाहुले नावाचा पोलीस कार्यरत आहे. त्याने ही घरफोडी केली आहे. चंद्रपूर शहरातील उपगनलावार ले- आऊट येथे मुस्तफा शेख यांचे घर आहे. त्यांचे संपूर्ण कुटुंब बाहेरगावी गेले असल्याने ११ ते १४ नोव्हेंबरदरम्यान घराला कुलूप होते. नेमक्या या संधीचा फायदा नरेशने उचलला. शेख कुटुंब परतल्यावर त्यांनी या प्रकाराची रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार तपास सुरू झाला असता धक्कादायक वास्तव पुढे आले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शेअर बाजारात पैसे गुंतवायची होती सवय 

येथील सीसीटिव्ही कॅमेरात नरेश कैद झाला आणि तो अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकला. स्थानिक गुन्हे शाखेसारख्या महत्वाच्या विभागात काम करणारा जबाबदार पोलीस या कृत्यात अडकल्याने खात्यात खळबळ उडाली. त्यामुळे या प्रकरणाचा गांभीर्याने तपास केला असता अनेक खुलासे पुढे आले. नरेश डाहुले याला शेअर बाजारात पैसे गुंतवण्याची सवय लागली होती. त्यासाठी तो परिचित लोकांकडून उधारी घेवू लागला. शेअर बाजारात सतत फटका बसत असल्याने त्याच्यावर २२ लाख रुपयांचे कर्ज झाले. हे कर्ज फेडण्यासाठी त्याने घरफोडीचा मार्ग पत्करला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cricket Match Explosion: क्रिकेट मॅच सुरू असताना भीषण स्फोट, संपूर्ण स्टेडिअम हादरले; एकाचा मृत्यू तर अनेक जण गंभीर

Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

SCROLL FOR NEXT