Tribal farmers rushed to hospital after consuming poison inside Rajura administrative office over long-pending land compensation dispute saam tv
महाराष्ट्र

चंद्रपूर हादरलं! १५ वर्षांपासूनचे प्रयत्न थकले, शेवटी हरले; ५ आदिवासी शेतकऱ्यांनी एकाच वेळी उचललं टोकाचं पाऊल

Chandrapur Aadivasi Farmers Suicide Attempt Land Compensation Delay: चंद्रपूर जिल्ह्यात 15 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जमीन मोबदल्यामुळे त्रस्त झालेल्या पाच आदिवासी शेतकऱ्यांनी राजुरा कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Omkar Sonawane

संजय तुमराम, साम टीव्ही

चंद्रपूर: जिल्ह्यात गेल्या 15 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जमीन मोबदल्याच्या प्रश्नावरून अखेर कोलाम बांधवांच्या संयमांचा बांध सुटला आहे. कोरपना तालुक्यातील माणिकगड सिमेंट (अल्ट्राटेक) कंपनीच्या चुनखडी क्षेत्रासाठी जमिनी देऊनही योग्य मोबदला न मिळाल्याने कुसुंबी येथील पाच आदिवासी शेतकऱ्यांनी आज राजुरा उपविभागीय अधिकारी कार्यालयातच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

राजुरा उमविभाअंतर्गत येणाऱ्या कोरपना तालुक्यातील कुसुंबी येथील कोलाम कुटुंबाच्या जमिनी माणिकगड सिमेंट कंपनीने आपल्या चुनखडी प्रकल्पासाठी अधिग्रहीत केल्या होत्या. मात्र या जमिनिंचा योग्य मोबदला अद्याप मिळालेला नाही. एकतर मोबादला द्या किंवा आमच्या जमिनी परत करा या मागणीसाठी हे आदिवासी शेतकरी गेल्या 15 वर्षांपासून कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही तोडगा निघत नसल्याने हताश झालेल्या शेतकऱ्यांनी आज टोकाचे पाऊल उचलले.

मिळालेल्या माहितीनुसार, पाचही शेतकरी राजुरा उपविभागीय अधिकारी रवींद्र माने यांच्या कार्यालयात आपली व्यथा घेऊन आले होते. तिथेच त्यांनी विष पिले. हा प्रकार लक्षात येताच कार्यालयात मोठी खळबळ उडाली. राजुरा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाचही जणांना राजुरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इराणचा नवा 14 कलमी शांतता प्रस्ताव; युद्धविराम प्रस्तावावर चर्चा होणार की तणाव वाढणार?

नसरापूर घटनेचा SIT करणार तपास; नराधमाला फाशी द्या, नागरिकांची मागणी

Nagpur Heatstroke: महाराष्ट्रात उष्णतेची जीवघेणी लाट, नागपूरमध्ये उष्माघातामुळे 3 जणांचा मृत्यू?

Maharashtra News Live Update: राजूर घाटात भीषण वनवा; अजिंठा पर्वतरांगेतील जंगलाला आग

8th Pay Commission: ५० लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार वाढ, नवीन वेतनश्रेणी कधी लागू होणार? मोठी अपडेट समोर

SCROLL FOR NEXT