Schoolgirls Molested In Running Bus Saam Tv
महाराष्ट्र

Chandrapur Crime: धावत्या बसमध्ये शाळकरी मुलींचा विनयभंग, चंद्रपुरातील संतापजनक घटना, स्टेशन मास्तरला अटक

Schoolgirls Molested In Running Bus: चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर रेल्वे स्थानकावर कार्यरत असलेल्या ५३ वर्षीय डेप्युटी स्टेशन मास्टरने धावत्या बसमध्ये मुलींची छेड काढली.

Priya More

संजय तुमराम, चंद्रपूर

चंद्रपूरमध्ये धावत्या बसमध्ये मुलींचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बल्लारपूर बस स्थानकावर ही घटना घडली आहे. पीडित मुलींनी याबाबत पालकांना माहिती दिली. त्यांनी आरोपीला चौप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. या घटनेमुळे चंद्रपूरमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर रेल्वे स्थानकावर कार्यरत असलेल्या ५३ वर्षीय डेप्युटी स्टेशन मास्टरने धावत्या बसमध्ये मुलींची छेड काढली. काही विद्यार्थिनी शिक्षणासाठी बल्लारपूर ते चंद्रपूर असा बसने नेहमी प्रवास करतात. नेहमीप्रमाणे त्या गुरूवारी सकाळी शिक्षणासाठी जाण्यासाठी निघाल्या. त्यावेळी बसमधून प्रवास करणाऱ्या स्टेशन मास्टर मिर्झा बेगने या मुलींची छेड काढली.

सायंकाळी ५ वाजता विद्यार्थिनी घरी परतल्या. घाबरलेल्या मुलींनी कुटुंबियांना घडला प्रकार सांगितला. संबंधित मुलींच्या पालकांनी एकत्र येत रेल्वे स्थानकावर धाव घेतली. यावेळी मुलींची छेड काढणारा आरोपी मिर्झा बेग तिथेच हजर होता. त्याने पुन्हा मुलींना छेडण्याचा प्रकार केला. संतापलेल्या कुटुंबीयांनी मिळून रेल्वे अधिकरी मिर्झा बेगला बेदम मारहाण केली आणि बल्लारपूर पोलीस ठाण्यात नेले.

याप्रकरणी मुलींच्या पालकांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला तत्काळ अटक केली. आरोपींविरुद्ध पोक्सो आणि कलम ७४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे चंद्रपूरमध्ये खळबळ उडाली आहे. मुलींच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

Maharashtra Live News Update: सोलापुरात नोकरी न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

MNS Warns Sushil Kedia : ५ तारखेनंतर काय करायचं ते करू; राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या केडियांना मनसेचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT