Chandrapur Crime Saam tv
महाराष्ट्र

Chandrapur Crime : मित्राला खोट्या केसमध्ये अडकविण्याचा धमकी; मुलीला दुचाकीवरून बसवून नेत वनरक्षकाकडून अत्याचार

Chandrapur News : रस्त्यावर एकटेच असल्याची संधी साधून वनरक्षकाने मुलाला धमकावले, यानंतर मुलीला गावी सोडून देण्याचे सांगत दुचाकीवर बसवून जंगलात घेऊन आत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली

संजय तुमराम

चंद्रपूर : मित्रांसोबत दुचाकीने घरी जात असताना वनरक्षकाकडून भयानक कृत्य करण्यात आले आहे. सोबत असलेल्या मित्राला धमकावत मुलीला गावापर्यंत सोडून देण्याचे सांगत दुचाकीवर बसवून नेत तिच्यावर अत्याचार करण्यात आला. सदरची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. 

एका अल्पवयीन मुलीवर वनरक्षकाने अत्याचार केल्याची हि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रंजीत दुर्योधन असे आरोपी वनरक्षकाचे नाव आहे. दरम्यान सदर घटनेत पीडित मुलगी कॉलेज सुटल्यानंतर आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून चंद्रपूरहून आपल्या गावाकडे जात होती. मात्र रस्त्यात त्यांची दुचाकी बंद पडली. यामुळे दुचाकीला काय झाले हे तपासण्यासाठी पीडित मुलगी व तिचा मित्र हे दोघेही थांबले होते. 

दुचाकीवर बसवून जंगलांत नेत अत्याचार 

दोघेही दुचाकी दुरुस्त करत असताना चंद्रपूरहून कारवाकडे जाणारा वनरक्षक रंजीत दुर्योधन हा त्यांच्याजवळ थांबला. त्याने मुलीच्या मित्राला खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केली. एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्याने या अल्पवयीन मुलीला पुढच्या गावापर्यंत सोडतो, असे सांगून सोबत घेतले. दुचाकीवर बसवून तिला चंद्रपूर- जुनोना मार्गावरील जंगलात घेऊन जात तिच्यावर अत्याचार केला. 

वनरक्षकाला घेतले ताब्यात 

वनरक्षाकडून मुलीवर जबरदस्तीने अत्याचार करण्यात आला. त्यानंतर तो घटनास्थळावरून पसार झाला. दरम्यान पीडित मुलीने घडल्या प्रकाराबाबत घरी सांगितले. यानंतर मुलीने पालकांसोबत बल्लारपूर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार केली. यानंतर पोलीसांनी आरोपी वनरक्षकाला गोंदिया येथून अटक केली आहे. बल्लारपूर पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात! भरधाव टेम्पोने शाळकरी मुलींना उडवलं, चालक मद्यधुंद अवस्थेत

Shinde vs Thackeray: वरळी कोळीवाड्यात एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने; कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की

Maharashtra Live News Update: - सावंतवाडीहून कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बस खाली सापडून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Gopichand Padalkar : कंडोम, साड्या, तलवारी... गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्याचे अपहरण करणाऱ्यांकडे काय-काय सापडलं?

Central Government: एलपीजी, शिक्षण आणि पायाभूत सुविधा; मंत्रिमंडळ बैठकीत केंद्र सरकारचे पाच मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT