Chandrapur Crime Saam tv
महाराष्ट्र

Crime: चंद्रपूर हादरले! माहेरी आलेल्या विवाहितेची हत्या, घरात घुसून गळ्यावरून चाकू फिरवला

Chandrapur Crime: चंद्रपूरमध्ये हत्याकांडाची भयंकर घटना घडली. माहेरी आलेल्या नवविवाहितेची घरात घुसून धारदार शस्त्राने वार करत आणि गळ्यावरून चाकू फिरवत हत्या करण्यात आली.

Priya More
  • चंद्रपूरमध्ये विवाहितेची निर्घृण हत्या

  • माहेरी आलेल्या महिलेची धारदार शस्त्राने वार करत हत्या

  • राजुरा येथे घरात घुसून महिलेला संपवलं

  • पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे

संजय तुमराम, चंद्रपूर

चंद्रपूरमध्ये माहेरी आलेल्या विवाहितेची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे चंद्रपूर हादरले. चंद्रपूर जिल्ह्यातील राजूर तालुक्यातील वेकोलिच्या धोपटाळा कामगार वसाहतीत ही घटना घडली. शितल रणधीर कुंभारे (३६ वर्षे) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून त्या उन्हाळी सुट्टीसाठी आपल्या माहेरी धोपटाळा येथे आल्या होत्या. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आपल्या लहान मुलीसह धोपटाळा टाऊनशिपमधील क्वॉर्टर क्रमांक ५२/२ येथे राहत होत्या. रात्री शितलची आई आणि भाऊ देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले होते. घरात शीतल आणि तिची मुलगी दोघीच होत्या. मुलगी दुसऱ्या खोलीत झोपलेली असताना अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश करून शीतल यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यानंतर आरोपीने त्यांच्या गळ्यावरून चाकू फिरवला.

या घटनेत गंभीर जखमी झालेल्या शितल यांचा जास्त रक्तस्राव होऊन जागीच मृत्यू झाला. सकाळी हा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलिसांनी शितल यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. राजुरा पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास राजुरा पोलिस निरीक्षक आसिफ रजा करत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून केला. पोलिस सध्या या प्रकरणातील आरोपीचा शोध घेत आहेत.

दरम्यान, रायगडमध्ये मुंबईवरून गावाला आलेल्या १५ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली. माणगावच्या घरोशीवाडी येथे डोंगर भागात निर्जन ठिकाणी या मुलीचा मृतदेह आढळून आला. डोक्यावर धारदार शस्त्राने वार करत आणि नंतर गळा आवळून तिची हत्या करण्यात आली होी. माणगाव पोलिसांनी तपास करत अवघ्या २४ तासांत ३४ वर्षीय आरोपीला बेड्या ठोकल्या. या घटनेमुळे रायगडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रेल्वे प्रवाशांची सुरक्षा अजुनही वाऱ्यावर; लोकल प्रवाशाकडे सापडला 35 सेमीचा चाकू

Maharashtra News Live Update: विद्यार्थ्यांचे आंदोलन योग्य; त्यांनी हिंसा केली नाही - राहुल गांधी

Nag Panchami 2026: नागपंचमीला तवा - कढई का वापरू नये? ही माहिती वाचून बसेल धक्का

Shravan Green Saree Design: श्रावणात हिरव्या साडीची जादू; ट्राय करा ग्रीन साडीचे हे 7 लेटेस्ट ट्रेंडी डिझाइन्स

ट्रेडिशनल ते मॉडर्न, ठुशी मंगळसूत्राच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स

SCROLL FOR NEXT