Accident News Saam tv
महाराष्ट्र

Chandrapur Accident News: कुटुंबावर काळाचा घाला; अपघातात एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू

Chandrapur Accident News : कुटुंबावर काळाचा घाला; अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू

संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर

चंद्रपूर : आयुर्वेदिक औषध घेण्यासाठी स्वतःच्या मालकीच्या गाडीने मध्य प्रदेशातील बैहर येथील कुमादेही येथे जात असताना परिवारावर काळाने घाला घातला. अपघातात (Accident) ब्रम्हपुरी येथील एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच (Accident Death) मृत्यू झाला, तर उपचारादरम्यान आणखी एक सदस्य दगावला. (Latest Marathi News)

ब्रम्हपुरीच्या श्रीनगर कॉलनीतील रहिवाशी विजय गणपत बडोले हे आपल्या परिवारासह स्वतःच्या कारने प्रवास करत होते. आयुर्वेदीक औषधी घेण्यासाठी बैहर (मध्‍यप्रदेश) येथे जात होते. दरम्‍यान रस्‍त्‍यावर एका दुचाकी वाहनास वाचविण्याच्या प्रयत्नात असताना कारचे नियंत्रण सुटले व कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकली. अपघातात वाहन चालक विजय गणपत बडोले (वय ५८), पत्नी कुंदा बडोले (वय ५२), मुलगा गिरीश बडोले (वय ३२) तर विवाहित मुलगी मोनाली चौधरी (बडोले) यांचा मृत्यू झाला.

लहान मुलांसह महिला गंभीर

या अपघातात पती– पत्‍नी, मुलगा व मुलीचा मृत्‍यू झाला आहे. तर सोबत असलेले दोन लहान नातवंडे व सून गंभीर जखमी आहेत. गंभीर जखमीना गोंदिया येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मृतकाचे शवविच्छेदन करून त्यांचे मृतदेह ब्रह्मपुरी येथे आणण्यात आले .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss : वजन राहील कंट्रोलमध्ये अन् चेहराही करेल ग्लो, रोज नाश्त्यासोबत प्या 'ही' २ मिनिटांत बनणारी स्मूदी

Women Schemes In Maharashtra: महिलांसाठी आर्थिक वरदान ठरणार! 'या' ५ सरकारी योजना लाडकीला जबरदस्त लाभ मिळवून देणार, अर्ज कसा करायचा?

पुण्यात अनैतिक संबंधामुळे घडला रक्तरंजित थरार; मुलाने आईच्या बॉयफ्रेंडला निर्घृणपणे संपवलं

Maharashtra News Live Update: नीट पेपर फुटीप्रकरणात पुण्यातून आणखी एकाला ताब्यात घेतलं

Navi Mumbai: नवी मुंबईत अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना अटक, लाच घेताना रंगेहाथ पकडलं

SCROLL FOR NEXT