Chandrapur Car Accident Saam tv
महाराष्ट्र

Chandrapur Car Accident: चंद्रपुरात भीषण अपघात, भरधाव कारची बसला धडक; एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू

चंद्रपुरात भीषण अपघात, भरधाव कारची बसला धडक; एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू

साम टिव्ही ब्युरो

Chandrapur Accident News: चंद्रपूर जिल्ह्यात भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. नागपूरवरून नागभीड येथे येणाऱ्या कारने ट्रॅव्हल्स बसला समोरासमोर धडक दिल्याची माहिती मिळत आहे. यात चार लोकांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.

या कारमध्ये एकूण सहा जण प्रवास करत होते. या अपघातात एक मुलगी व महिला गंभीर जखमी झालेत. जखमींना उपचारासाठी नागपूरला हलविले आहे. तर मृत दोन महिला व दोन पुरुष अजूनही कार मध्ये अडकून आहेत.  घटनास्थळी नागभीड पोलीस ठाण्याची चमू दाखल झाली असून मृतकांना कारमधून बाहेर काढण्याचे काम सुरु आहे

हा इतका भीषण अपघातात नेमका झाला तरी कसा, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. याबाबत पोलीस अधिक माहिती घेत आहे. (Latest Marathi News)

रस्ता ओलांडताना रिक्षाची धडक, वृद्धेचा मृत्यू

आजच आणखी एक अपघात घडला आहे. उल्हासनगरमध्ये पहाटे रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्‍या रिक्षाने धडक (Accident) दिल्‍याने वयोवृद्ध आजीबाईचा मृत्यू (Death) झाला. ताराबाई पावलास काळूसे असे मयत आजीबाईच नाव आहे.

अंबरनाथमधील (Ambarnath) फॉरेस्ट नाका परिसरात ही घटना पहाटे ५ वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान आजी ताराबाई काळूसे या रस्ता ओलांडताना अचानक भरधाव येणाऱ्या रिक्षाने त्यांना धडक मारली. यात ताराबाई गंभीर जखमी झाल्‍या होत्‍या. अपघातानंतर ताराबाईला उपचारासाठी उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्‍यांचा मृत्यू झाला.

फाॅरेस्ट नाका परिसरातील ही घटना असून संपूर्ण अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. दरम्यान नातेवाईकांनी या घटनेची तक्रार अंबरनाथ पोलीस ठाण्यात केली असून पोलिसांनी रिक्षाचालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: बल्लारपूरमध्ये रंगणार तिरंगी लढत; सुधीर मुनगंटीवारांपुढे काँग्रेसच्या संतोष सिंह रावतांचं आव्हान

IND vs SA: निर्णायक सामन्यात टीम इंडियचा टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय; पाहा प्लेइंग 11

World : जगातील सर्वात मोठे नदी बेट कोणते? हनिमूनसाठी सर्वात रोमँटिक ठिकाण

School Holiday Update: शाळांना खरंच सलग ३ दिवस सुट्टी? शिक्षण आयुक्त म्हणाले, सरसकट नाहीच!

Shahaji Bapu Patil : डोंगर-झाडीनं माझं नाव झालंय, इज्जत घालवू नका : शहाजीबापू पाटील

SCROLL FOR NEXT