Amid the ongoing ownership row in Maharashtra politics, Minister Chandrakant Patil said that BJP is a party of workers, unlike Shiv Sena and NCP which belong to individual leaders. Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: शिवसेना उद्धव ठाकरेंची तर राष्ट्रवादी शरद पवारांचीच; मंत्री चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान

Chandrakant Patil speech in Tasgaon Sangli: राष्ट्रवादी शरद पवारांचा, शिवसेना उद्धव ठाकरेंची, तर मनसे राज ठाकरेंची पार्टी... मात्र भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष कोणाचा, यावरून वाद सुरू असताना या पक्षांच्या “मालकीच्या” वादावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान केले.

Omkar Sonawane

साधारण तीन वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत काही आमदारांचा फौजफाटा घेऊन गुवाहटी गाठली आणि राज्यात सत्तापालट झाली. 2019 साली उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत निवडणूक लढवली मात्र मुख्यमंत्रीपदाच्या वादावरून ठाकरे यांनी भाजपसोबत युती तोडून कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती करून महाविकासआघाडीचे सरकार स्थापन केले. मात्र अडीच वर्षात हे सरकार कोसळले आणि हिंदुत्वासोबत गद्दारीचा ठपका लाऊन एकनाथ शिंदे आणि चाळीस आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आणि खरी शिवसेना आमचीच हा लढा सुरू झाला.

हा लढा आता न्यायप्रिवष्ठ आहे. मात्र निवडणुका आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर खरी शिवसेना आमचीच असा दावा करण्यात आला. तसेच राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये देखील दोन गट पडले आहे. घडयाळ चिन्ह हे अजित पवारांना दिले गेले. मात्र यावरूनच आता भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठे विधान केले आहे.

महाराष्ट्रमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कोणाचे यावरून वाद सुरू असताना या पक्षाच्या मालकीच्या बाबतीत भाजपाचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक मोठं विधान केलंय. महाराष्ट्रातील पक्षांची जर यादी बघितली तर राष्ट्रवादी हा शरद पवारांचा पक्ष आहे. तर शिवसेना उद्धव ठाकरेंचा आणि मनसे राज ठाकरेंचा पक्ष आहे.

मात्र भाजपा पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे असं म्हणत भाजप विचारावर चालणारा पक्ष आहे. या पक्षात अनेक नेते येऊन गेले. पक्ष मोठा केला. पक्ष चालत राहिला असं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेय. ते सांगली जिल्हयातील तासगावमध्ये भाजप पक्ष कार्यालयाच्या उद्घाटन आणि कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ambernath Accident: अंबरनाथमध्ये भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू, अपघातग्रस्त कारमध्ये शिवसेनेच्या महिला उमेदवार

IAS Transfers: पुणे महापालिकेतील उपायुक्तांच्या पुन्हा बदल्या; अधिकारी धास्तावले

भाजपचा क्लीन स्वीप? १०० पेक्षा अधिक नगरसेवकांनी बिनविरोध उधळला विजयाचा गुलाल, स्थानिक पातळीवर कमळ फुललं |VIDEO

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीवर कारवाईचा बडगा? KYC मुळे सरकारी लाडकीचा भांडाफोड

Horoscope: 'या' ५ राशींच्या नशिबाचे चमकतील तारे; यशासह धनलाभाचा योग, जाणून तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT