Chandrakant Patil, BJP 
महाराष्ट्र

...तर तुम्हांला सोन्याचा मुकुट घालेन; चंद्रकांत पाटील

विजय पाटील

सांगली : सांगली महापालिकेत ‘कार्यक्रम’ करणाऱ्या नेत्यांना तुम्ही दोन छोटे शॉक दिले आहेत. एकदा एक ‘मोठा शॉक’द्या, तुमचा सोन्याचा मुकुट घालून सत्कार करतो अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महापालिकेतील भाजप पदाधिकाऱ्यांच्या सत्कारप्रसंगी नवे 'टार्गेट' दिले. chandrakant-patil-sangli-political-news-mahapalika-sml80

महापालिकेत स्थायी समिती, महिला व बालकल्याण आणि समाजकल्याण समिती सभापती निवडीत भाजपने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना यांच्या संभाव्य कार्यक्रमाला दाद न देता आपले वर्चस्व ठेवले. याबद्दल जयंत पाटील यांचे नाव न घेता चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक करीत नवे 'टार्गेट' दिले. यावेळी नगरसेवक, पदाधिकारी, कोअर कमिटी सदस्य उपस्थित होते. यावेळी त्यांनी महापौर- उपमहापौर निवडणुकीत भाजप सोडून गेलेल्यांना परतण्याचे आवाहनही केले.

महापालिका आणि इस्लामपूर पालिकेत सत्तांतर घडवून भाजपने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना धक्के दिले आहेत. नुकतेच महापालिकेच्या सभापती निवडीतही राष्ट्रवादीचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत. हा धागा पकडत चंद्रकांत पाटील Chandrakant Patil, BJP यांनी येणाऱ्या निवडणुकांमध्ये जयंत पाटील यांना पराभूत करून धक्का देण्याचे 'टार्गेट' कार्यकर्त्यांना दिले आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : अजित पवार मला टॉर्चर करतात, शिंदेंचा गंभीर आरोप

Maharashtra Politics : रोहित पवारांची वृत्ती औरंगाजेबासारखी, मला अजित पवारांच्या मुलांची चिंता; गोपीचंद पडळकर असे का म्हणाले?

Vice President: चर्चा ६ नावांची; वर्णी मात्र महाराष्ट्राच्या राज्यपालांची, राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यामागे काय आहे भाजपचा राजकीय डाव?

Hair Care Tips: केसांना दही लावल्याने होतात 'हे' भन्नाट फायदे

Video : तेरे जैसा यार कहाँ... गाणं म्हणणारे तहसीलदार निलंबित, निरोप समारंभाची पोस्ट पडली महागात

SCROLL FOR NEXT