Belgaum News : संजय राऊतांना स्मृतिभ्रंश, चंद्रकांत पाटलांचा राऊतांना टोला  Saam Tv
महाराष्ट्र

Belgaum News : संजय राऊतांना स्मृतिभ्रंश, चंद्रकांत पाटलांचा राऊतांना टोला

बेळगाव महापालिकांच्या निवडणूकीत भाजपाने 35 काँग्रेसला 10, अपक्ष 8, महाराष्ट्र एकीकरण समितीला 4 आणि एमआयएम चा १ असे उमेदवार विजयी झाले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बेळगावमध्ये भाजप जिंकलीच नाहीतर मराठी भाषिक नगरसेवक विजयी झाले, ही आनंदाची बाब आहे. आता महापौर कोण करायचा? हा कर्नाटक भाजपचा निर्णय आहे, असे म्हणत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बेळगाव महापालिका निवडणूकांच्या निकालावर आपला आनंद व्यक्त केला आहे. इतकेच नव्हे तर, यावेळी त्यांनी शिवसेनेवर निशाणाही साधला आहे.

हे देखील पहा-

बेळगाव महापालिका निवडणूकीच्या निकालावर संजय राऊत यांची आलेली प्रतिक्रिया अपेक्षितच होती. भाजपच्या विजयी नगरसेवकांपैकी निम्मे मराठी आहेत, मग बेळगावमध्ये मराठी भाषिक हरला कसा? असा सवाल विचारत त्यांनी संजय राऊतांना स्मृतिभ्रंश, सकाळी काय बोलले हे संध्याकाळी त्यांना आठवत नाही, असा सणसणीत टोलाही लगावला आहे.

दरम्यान, बेळगाव महापालिकांच्या निवडणूकीत भाजपाने 35 काँग्रेसला 10, अपक्ष 8, महाराष्ट्र एकीकरण समितीला 4 आणि एमआयएम चा १ असे उमेदवार विजयी झाले. बेळगावच्या जनतेने भाजपाला जनतेने स्पष्ट बहुमताचा कौल दिला. मात्र महाराष्ट्र एकीकरण समितीला या निवडणुकीत धक्कादायक पराभवाचा झाला.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पांढरं आणि निळ्या आधार कार्डात काय फरक? जाणून घ्या 5 महत्त्वाच्या गोष्टी

Maharashtra News Live Update: शरद पवार यांना सोमवारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार! सुप्रिया सुळेंनी दिली महत्त्वाची माहिती

शेख हसीना बांग्लादेशात परतणार? बांग्लादेशात पुन्हा हिंसाचार उफाळणार?

Health Tips : भात खाल्ल्यानंतर लगेच झोप येतेय? शरीरात नक्की काय घडतं, जाणून घ्या

Rohit Sharma Mumbai Indians Captain : मुंबईचा राजा! रोहित शर्मा पुन्हा MI चा कर्णधार, ५.४५ चं कोडं अखेर सुटलं; पाहा खास व्हिडीओ

SCROLL FOR NEXT