pandharpur chandrabhaga river pollution due to drainage water  Saam Digital
महाराष्ट्र

Chandrabhaga River Water Pollution: चंद्रभागा नदीत मैलामिश्रित पाणी,आषाढीच्या तोंडावर वारकऱ्यांच्या जीवाला घोर Video

Pandharpur Latest Marathi News : गोपाळपूर येथून नदीपात्रातून साेडल्या जाणा-या मैला मिश्रित व घाण पाण्यामुळे नागरिकांचे आराेग्य धाेक्यात आले आहे.

भारत नागणे

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपुरातील चंद्रभागा नदीत मैला मिश्रित पाणी सोडले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या मैला मिश्रित घाण पाण्यामुळे भाविकांसह नदीकाठच्या हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

आषाढी यात्रेच्या तोंडावर चंद्रभागा नदी पात्रात मैला मिश्रित पाणी सोडले जात असल्याने चंद्रभागेचे पावित्र्य धोक्यात आले आहे. पंढरपूर शहरातील मैला मिश्रित व घाण पाणी गोपाळपूर येथून सोडले जात आहे.

गोपाळपूर येथून नदीपात्रातून साेडल्या जाणा-या मैला मिश्रित व घाण पाण्यामुळे नागरिकांचे आराेग्य धाेक्यात आले आहे. याबाबत प्रशासकीय अधिकारी देखील फारसे गांभीर्य नसल्याचे दिसून येते. आगामी काळात हाेणा-या वारीच्या पार्श्वभूमीवर गोपाळपूर येथून गेल्या अनेक दिवसांपासून साेडले जाणारे हे पाणी शासन कशा प्रकारे राेखणार अथवा यावर काय उपाययोजना करणार याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: चंद्रपूर- मनपा आमसभेच्या कोरमवरून महापौर नगरसेवकांमध्ये आरोप प्रत्यारोप

श्रावण कधीपासून सुरु होणार? जाणून घ्या तारीख आणि धार्मिक महत्त्व

Health Care : सतत थकल्यासारखे वाटते का? ' ही' ५ गंभीर लक्षणे फॅटी लिव्हरची असू शकतात, वेळीच ओळखा

Vaidehi Parshurami: पैठणीत खुललं वैदेही परशुरामीचं सौंदर्य; सोज्वळ सौंदर्याने जिंकली चाहत्यांची मनं

Live Update : निवडणूक चिन्ह कुणाचे? सर्वोच्च न्यायालयात सिब्बल, सरन्यायाधीश अन् जज बागची यांच्यात जोरदार चर्चा

SCROLL FOR NEXT