Meteorological Department, Maharashtra Weather Forecast  Saam Tv
महाराष्ट्र

"या" राज्यात पुढील 2 दिवसात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

राज्यात २ दिवस वादळी वाऱ्याबरोबरच पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने (India Meteorological Department) वर्तवली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: वाढत्या उष्णतेमुळे अंगाची सध्या लाही लाही होत असताना दिसून येत आहे. राज्यात २ दिवस वादळी वाऱ्याबरोबरच पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने (India Meteorological Department) वर्तवली आहे. महाराष्ट्रात २१ एप्रिलपासून वादळी वाऱ्याबरोबरच अवकाळी पावसाची (Rain) शक्यता आहे. (Maharashtra Weather Forecast)

हे देखील पहा-

पश्चिमी चक्रवातामुळे आणि कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने २१ एप्रिलपासून २ दिवस राज्यामध्ये वादळी (Storm) वाऱ्याबरोबरच पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र (Maharashtra) आणि मराठवाड्यामध्ये २१ एप्रिलपासून पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

मराठवाड्याबरोबरच (Marathwada) तळकोकणाला या वादळी वाऱ्याचा जास्त प्रमाणात फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रत्नागिरी (Ratnagiri) आणि सिंधुदुर्गात देखील वादळी वाऱ्याबरोबरच पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्रात २१ एप्रिलपासून काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापुरामध्ये वादळी वाऱ्याबरोबरच पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. संपूर्ण विदर्भात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली आणि परभणी या ठिकाणी देखील पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, २१ एप्रिलपासून राज्यात काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार असला, तरी हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज विदर्भातील चंद्रपूर आणि अकोल्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. तर उद्यापासून म्हणजे २० एप्रिलपासून तापमानात घट होणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे महापालिकेसाठी भाजपकडून गटनेता पदावर शिक्कामोर्तब

Korean Skin Care: ग्लोईंग आणि कोरियन ग्लास स्किन पाहिजे? मग रोज रात्री झोपताना 'ही' घरगुती पेस्ट नक्की लावा

Valentine Day 2026: प्रेमाच्या आठवड्याची सुरुवात कधी होणार? जाणून घ्या प्रत्येक दिवस का आहे खास?

Nashik Crime : उपसरपंचाकडून बायकोची हत्या, रात्री दारूच्या नशेत घरी आला, नंतर झोपलेल्या बायकोला जागीच संपवलं

Bridal Saree Designs: लग्नात रिस्पेशनसाठी 5 डिझाईनर साड्या, नवरीचा लूक दिसेल भारी

SCROLL FOR NEXT