Rain Alert Today in Maharashtra Saam TV
महाराष्ट्र

Weather Update : राज्यात आज पुन्हा पाऊस, ढगाळ हवामानामुळे वातावरण बदललं; IMD कडून 'या' जिल्ह्यांना अलर्ट

Rain Alert Today in Maharashtra : आयएमडीने जारी केलेल्या अंदाजानुसार, आज मुंबईसह उपनगरात पावसाच्या हलक्या सरी बसरण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातही पाऊस होणार आहे.

Satish Daud

मागील काही दिवसांपासून वातावरणात मोठे बदल होत आहेत. कधी उन्हाच्या झळा तर कधी रिमझिम पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यातच बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता आणखीच वाढत आहे. परिणामी पूर्व भारतात पावसासाठी पोषक वातावरण तयार झालंय. याचा काहीसा परिणाम महाराष्ट्रावरही होणार आहे. आज रविवारी (ता. १५) काही विभागात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.

आयएमडीने जारी केलेल्या अंदाजानुसार, आज मुंबईसह उपनगरात पावसाच्या हलक्या सरी बसरण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे विदर्भासह मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस पडणार आहे. उर्वरित भागात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे.

विशेष बाब म्हणजे, सप्टेंबर महिना सुरु होताच राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये धुव्वाधार पाऊस झाला होता. सलग आठवडाभर हा पाऊस सुरू होता. त्यामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहिले आणि पाणीपुरवठा करणारे तलाव तसेच धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा जमा झाला. मराठवाड्याला पाणीपुरवठा करणारे जायकवाडी धरण १०० टक्के भरले. त्यामुळे धरणातून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

आता गेल्या आठवडाभरापासून राज्यात पावसाने विश्रांती दिली आहे. त्यामुळे उन्हाचा कडाका देखील वाढत आहे. शनिवारी २४ तासांमध्ये चंद्रपुर येथे राज्यातील उच्चांकी ३३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. इतर जिल्ह्यातही तापमानाचा पारा वाढताच आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे.

अशातच भारतीय हवामान खात्याने आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तविली आहे. मुंबईसह उपनगर आणि पुण्यातही अधून मधून पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातही पावसाचा अंदाज आहे. उर्वरित राज्यात दिवसभर ढगाळ वातावरण राहील, असं हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT