Central Railway Saam Tv
महाराष्ट्र

Ashadi Ekadashi Special Train: वारकऱ्यांसाठी खुशखबर! मध्य रेल्वेकडून धावणार ३ एकेरी विशेष गाड्या; कुठे कुठे थांबणार?

Central Railway To Run 3 Ashadhi Special: आषाढी एकादशीनिमित्त मध्य रेल्वेने पुणे, मिरज, नागपूर आणि लातूर दरम्यान ३ विशेष एकेरी गाड्यांची घोषणा केली असून, लाखो वारकऱ्यांना प्रवास सुलभ होणार आहे.

Bhagyashree Kamble

आषाढी एकादशी आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. विठूरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविक पायी वारी करत 'विठू नामाचा जयघोष'करत श्री क्षेत्र पंढरपूर गाठतात. या दिवशी पंढरपूर नगरी भक्तांनी गजबजून जाते. दरम्यान, आषाढी एकादशीच्या दिनी लाखो भाविक आपल्या गावाकडे मार्गस्थ होतात. अशावेळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते. तसेच प्रवाशांचा खोळंबा होतो. यावर तोडगा काढण्यासाठी मध्य रेल्वेने विशेष रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

आषाढी एकादशीनिमित्त सहभागी होणाऱ्या यात्रेकरूंच्या सोयीसाठी मध्य रेल्वे ३ एकेरी आषाढी विशेष गाड्या चालवणार आहेत. १ जुलै ते १० जुलै या कालावधीत ३ एकेरी विशेष गाड्यांची घोषणा मध्य रेल्वेने केली आहे. या गाड्या पुणे- मिरज, मिरज - नागपूर आणि मिरज - लातूर या मार्गांवर धावणार आहेत. या एकेरी विशेष गाड्यांसह, मध्य रेल्वे ८३ आषाढी विशेष गाड्या चालवत आहेत.

१. पुणे - मिरज एकेरी विशेष (०१४१३)

८ जुलै रोजी सकाळी ७ वाजता पुण्याहून सुटणार.

त्याच दिवशी दुपारी १२:३० वाजचा मिरज येथे पोहोचणार.

थांबे - लोणंद, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, सांगली.

कोच सरंचना - 2 AC 3-tier, 10 Sleeper, 4 General, 2 Second Seating with Brake Van

२. मिरज - नागपूर एकेरी विशेष (०१२१३)

८ जुलै रोजी दुपारी १२:५५ मिरजहून सुटणार.

९ जुलै रोजी १२:२५ वाजता नागपूरला पोहोचणार.

थांबे - अरग, पंढरपूर, कुर्डूवाडी, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, यासह इतर स्टेशन.

कोच सरंचना - 2 AC 3-tier, 10 Sleeper, 4 General, 2 Second Seating with Brake Van

३. मिरज - लातूर अनारक्षित एकेरी विशेष

६ जुलै रोजी सकाळी ९:३० वाजता मिरजहून सुटणार.

त्याच दिवशी संध्याकाळी ७:२० मिनीटांनी लातूरला पोहोचणार.

थांबे - सांगोला, पंढरपूर, कुर्डुवाडी, बार्शी टाऊन, धाराशिव, औसा रोड, हरंगुळ

कोच संरचना - 12 General Coaches, 2 Second Seating with Brake Van

आरक्षण आणि तिकीटांची माहिती

01413 व 01213 गाड्यांचे आरक्षण दि. 29.06.2025 पासून सुरू होणार.

संकेतस्थळावर किंवा आरक्षण केंद्रावर तिकीट काढता येणार.

अनारक्षित कोचसाठी युटीएस अॅपवर तिकीट उपलब्ध.

सामान्य दर आकारले जातील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धाराशिव जिल्ह्यात नगरपरिषद मतदार यादीत घोळ

Pune Police: पुण्यात १७ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या, कुणाची कुठे झाली बदली? वाचा संपूर्ण लिस्ट

Tridashansh Yog: अवघ्या काही तासांनी गुरु-बुध तयार करणार त्रिदशांश योग; 'या' राशींच्या नशीबी येणार अखेर श्रीमंती

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

SCROLL FOR NEXT