Crime: पैसे अन् शारीरिक छळ, मॅट्रिमोनियल साईट्सवर ३० महिलांना गंडा; लखोबा लोखंडेला बेड्या

Matrimonial Site Trap: मॅट्रिमोनियल साईटवरून प्रेमाचे आमिष दाखवून मुंबई, पुणे, नाशिकमधील ३० महिलांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून महत्त्वाचे पुरावेही हस्तगत.
Nashik Crime News
Online matrimonial trapSaam TV News
Published On

ऑनलाईन मॅट्रिमोनियल साईट्सचा गैरवापर करून महिलांना फसवणाऱ्या एका आरोपीचा पर्दाफाश नाशिक पोलिसांनी केला आहे. नाशिकमधील एका तरुणीच्या तक्रारीनंतर मुंबईतून मुस्तफा उर्फ हर्षवर्धन या आरोपीला अटक करण्यात आली आहे. या आरोपीने आतापर्यंत ३० पेक्षा जास्त महिलांना प्रेमाचे आमिष दाखवून फसवल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

मुस्तफाने मॅट्रिमोनियल साईट्सवर हिंदू नावे वापरून महिलांशी संपर्क साधायचा. त्यांच्याशी मैत्री करून लग्नाचे आमिष दाखवायचा आणि त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा. नंतर आर्थिक, मानसिक आणि शारीरिक शोषण करून त्यांना वाऱ्यावर सोडायचा. नाशिकच्या पीडित तरुणीकडून त्याने एक कार आणि बुलेट उकळली होती.

Nashik Crime News
Solapur Crime: राष्ट्रवादीच्या नेत्याकडून महिलेवर जबरदस्ती, मध्यरात्री लॉजवर विनयभंग; महिलेनं व्हिडिओ काढत..

फसवणूक झाल्याचं लक्षात येताच संबंधित तरुणीने नाशिकमधील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, पोलिसांनी तपास करून आरोपीला मुंबईहून अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी कार आणि बुलेट जप्त केली.

पोलीस तपासात आरोपीने ३० हून अधिक महिलांना फसवल्याचा संशय व्यक्त केला आहे. या आरोपीने आतापर्यंत मुंबई, पुणे, नाशिक यासह विविध शहरांमध्ये हिंदू नावे वापरून महिलांना फसवलं. मॅट्रिमोनियल साईट्सवर अकाऊंटवर महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचा वापर केला.

Nashik Crime News
Car Romance: महामार्गावर कपलचा खुल्लमखुल्ला रोमान्स, कारच्या सनरूफवर उभं राहून लिपलॉक; VIDEO तुफान व्हायरल

या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, या प्रकरणामागे आणखी कुणाचा सहभाग आहे का? आरोपीनं आणखी किती जणांना फसवलं? याचा तपास सुरू आहे. दरम्यान, नाशिक पोलिसांनी हा सर्व प्रकार उघडकीस आणल्यानंतर पीडित महिलांनी पुढे येऊन तक्रार दाखल करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांची ओळख गुप्त ठेवण्यात येणार असल्याचंही पोलिसांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com