ONION FARMERS GET BIG RELIEF; GOVERNMENT TO PROCURE ONIONS AT RS 1235 PER QUINTAL 
महाराष्ट्र

कांदा उत्पादकांची चिंता मिटली; सरकार खरेदी करणार शेतकऱ्यांकडील कांदा, कृषीमंत्र्यांची घोषणा

Government Decision On For Onion Farmers: केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. सरकार शेतकऱ्यांकडून 1235 रुपये प्रति क्विंटल दराने कांदा खरेदी करणार आहे.

Bharat Jadhav

  • कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारची मोठी घोषणा.

  • केंद्र सरकार 1235 रुपये प्रति क्विंटल दराने कांदा खरेदी करणार.

  • घसरलेल्या कांदा बाजारभावामुळे शेतकरी अडचणीत होते.

गेल्या काही दिवसांपासून शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांनी पिकवलेला कांदा अगदी कवडीमोल भावाने विकला जातोय. पश्चिम आशियातील युद्धामुळे शेती क्षेत्राला मोठा फटका बसलाय. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कांदा पिकाला कवडीमोल भाव आहे. कित्येक क्विंटल कांदा विकूनही शेतकऱ्यांच्या हातात पैसे राहत नव्हते. यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठी घोषणा केली आहे.

1235 रुपये प्रति क्विंटलने कांदा खरेदी

उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याने शेतकरी चिंतेत आला होता. बळीराजाची हीच अडचण लक्षात घेत सरकारने कांदा खरेदी करण्याची घोषणा केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान हे साताऱ्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी कांदा खरेदी करण्याची घोषणा केली. केंद्र सरकार शेतकऱ्यांकडून 12.35 रुपये प्रति किलोच्या दराने (म्हणजेच 1235 रुपये प्रति क्विंटल दराने कांदा खरेदी करेल, असे त्यांनी सांगितले आहे.

या घोषणेमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते. महाराष्ट्र हे प्रमुख कांदा उत्पादक राज्य आहे. पश्चिम आशियातील संकटामुळे कांद्याच्या निर्यातीत बाधा निर्माण झाली आहे. त्यामुळेच कांद्याचा भाव घसरला आहे, असेही चौहान यांनी यावेळी सांगितले. चौहान यांच्या या घोषणेनंतर नाफेडला कांदा खरेदीचे आदेश देण्यात आलेत.

सरकारच्या घोषणेनंतरही शेतकरी वर्गात नाराजी

सरकारने कांदा खरेदी करण्याची घोषणा केली असली तरीही शेतकऱ्यांनी मात्र असमाधान व्यक्त केलं आहे. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघाने 1235 रुपयांचा हा दर पुरेसा नाही. या पैशांतून शेतकऱ्यांचा अत्पादन खर्चदेखील निघणार नाही. कांद्याला कमीत कमी 3,000 रुपये प्रति क्विंटलचा भाव दिला पाहिजे, तरच शेतकऱ्यांना फायदा होईल. ज्या शेकऱ्यांनी कवडीमोल भावाने कांदा विकला त्यांना सरकारने नुकसान भरपाईदेखील द्यायला हवी, अशी मागणीही महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघाने केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: फुटीरांच्या मतदार संघात उद्धव ठाकरे

Ketan Agarwal Case: सियाच्या आई-वडिलांची कसून चौकशी, पोलिसांनी विचारलेले ९ प्रश्न कोणते?

Pune : पुणे हादरलं! विहिरीत उडी मारून महिलेने संपवलं जीवन; धक्कादायक कारण समोर

Kangana Ranaut: 'मुलांच्या गुन्ह्यांसाठी पालकांना दोष देऊ...'; केतन अग्रवाल हत्या प्रकरणावर कंगना राणौतची प्रतिक्रिया

Maharashtra politics : ठाकरे-फडणवीसांची जवळीक, सामंतांनी थेट निशाणा साधला, स्टेट्‍सची राजकीय वर्तुळात चर्चा

SCROLL FOR NEXT