Chhagan Bhujbal  Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra-Gujarat water Crisis: भुजबळांच्या महत्वाकांक्षी नार-पार नदीजोड प्रकल्पाला केंद्राचा खोडा? महाराष्ट्र गुजरात पाणी प्रश्न पेटणार?

Maharashtra-Gujarat water Crisis: छगन भुजबळ यांच्या महत्वाकांक्षी नार-पार नदीजोड प्रकल्पाला केंद्र सरकारचा खोडा, सुत्रांची माहिती आहे.

Bharat Jadhav

अभिजीत सोनवणे, साम प्रतिनिधी

छगन भुजबळ यांच्या महत्वाकांक्षी नार-पार नदीजोड प्रकल्पाला केंद्र सरकारने खोडा घातलाय. गुजरातला जाणारं पाणी महाराष्ट्रातच अडवण्यासाठी प्रकल्पाची उभारणी करण्यात आली होती. मात्र केंद्राने या प्रकल्पाला नकार दिला. दरम्यान राज्यांतर्गत हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. नाशिक, मराठवाडा आणि खानदेशाला या प्रकल्पाचा फायदा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

पश्चिमवाहीनी दमणगंगा-नार-पार, औरंगा व अंबिका या नदी खोऱ्यातील महाराष्ट्राच्या पाणलोट क्षेत्रातील पाणी पश्चिमेकडे समुद्राला आणि गुजरातकडे वाहते. दमणगंगा आणि नार-पार खोऱ्यातील पाणी पूर्वेकडे दुष्काळग्रस्त मराठवाड्यासह नाशिकच्या पूर्व भागात वळविण्यासाठी राज्यांतर्गत महत्वकांक्षी प्रकल्प राबवण्यासाठी छगन भुजबळ आग्रही आहेत.

तापी खोऱ्यामधील महाराष्ट्राच्या हक्काच्या १९१ टीएमसी पाण्यापैकी सुमारे १०० टीएमसी पाणी गुजरातमधील उकई धरणात जाते. तसेच गोदावरी खोऱ्यातील मराठवाडा आणि नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यांना दुष्काळाचा फटका बसत असतो. या भागातील दुष्काळावर मार्ग काढण्यासाठी पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोरे आणि गिरणा उपखोऱ्यात वळवण्यात येणार आहे. दरम्यान राज्यातील सर्व नदी-जोड प्रकल्प उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील दुष्काळी जिल्ह्यांना पाणी पुरवणारे आहेत.

महाराष्ट्राची सिंचनाची टक्केवारी २३ असून देशात शेवटून दुसऱ्या क्रमांकाची आहे. उत्तरेकडील राज्यांची सिंचनाची टक्केवारी ५० पेक्षा अधिक आहे. दरम्यान पूर्व विदर्भासाठी वरदान ठरणाऱ्या वैनगंगा-नलगंगा नदी-जोड प्रकल्पाने वैनगंगा खोऱ्यातील अतिरिक्त ६२ टीएमसी पाणी पूर्व विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा आदी दुष्काळी भागात वळविण्यात येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT