सुमित सावंत
Monkeypox Advisory: जगभरात कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर मंकीपॉक्सची प्रकरणे वाढू लागली आहेत. युरोपीय देशामंध्ये मंकीपॉक्सच्या रुग्णसंख्येत हळूहळू वाढ होत आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण आढळून आले आहेत. याबाबत WHO नेही बैठक घेत चिंता व्यक्त केली होती. यानुसार WHOच्या मते, मंकीपॉक्स हा विषाणूजन्य जुनोटिक रोग आहे. याचे विषाणू प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरतात. भारतात मंकीपॉक्सचा एकही रुग्ण अद्याप आढळून आलेला नाही, मात्र इतर देशांतील वाढती दहशत पाहता केंद्रीय आरोग्य विभागाने (Union Ministry Of Health) सर्व राज्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे मुंबई महानगर पालिकेचा अलर्ट देण्यात आला आहे. BMCने मंकीपॉक्स आजाराबाबत अलर्ट मार्गदर्शक तत्वे (Advisory) जारी केली आहेत. (Monkeypox virus news)
अमेरिका-ब्रिटनसह जगातील अनेक देशांमध्ये मांकीपॉक्सची प्रकरणे समोर आल्यानंतर भारत सरकार सतर्क झाले आहे . केंद्र सरकारने शुक्रवारी सर्व आंतरराष्ट्रीय एंट्री पॉइंट्स - विमानतळ, बंदरे आणि लँड बॉर्डर क्रॉसिंगवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. आफ्रिकेतून भारतात येणाऱ्या आणि मंकीपॉक्सची लक्षणे दाखवणाऱ्या प्रवाशांचे नमुने पुढील तपासणीसाठी पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) येथे पाठवले जातील.
मंकीपॉक्सच्या संशयित प्रकरणाचे विलगीकरण आणि व्यवस्थापन;
1. विमानतळ अधिकारी स्थानिक आणि स्थानिक नसलेल्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करत आहेत.
2. संशयित रुग्णांच्या विलगीकरणासाठी कस्तुरबा रुग्णालयात स्वतंत्र वार्ड, वॉर्ड क्र. ३० (२८ बेड) तयार केले असून, त्यांचे चाचणी नमुने एनआयव्ही पुणे प्रयोगशाळा येथे पाठवले जातील.
3. मुंबईतील सर्व आरोग्य सुविधांना सूचित केले जात आहे की कोणत्याही संशयित प्रकरणाची सूचना कस्तुरबा रुग्णालयात पाठवावी.
अशा प्रकारे मंकीपॉक्स विषाणूचा संसर्ग होतो;
मंकीपॉक्स विषाणू संक्रमित प्राण्याच्या चाव्याव्दारे किंवा त्याचे रक्त, शरीरातील द्रव किंवा फर यांना स्पर्श करून संक्रमित होऊ शकतो. हे उंदीर, ससे यांसारख्या प्राण्यांच्या चाव्याव्दारे पसरते असे मानले जाते. हा विषाणू माणसांमध्ये खूप वेगाने पसरतो. तुम्ही संक्रमित व्यक्तीचे कपडे वापरल्यास तुम्हाला मंकीपॉक्स होऊ शकतो. हा विषाणू शिंक आणि खोकल्यामुळे देखील पसरू शकतो.
मंकीपॉक्सची लक्षणे काय आहेत? (Monkeypox virus symptoms)
मंकीपॉक्सची लागण झाल्यापासून पाच दिवसांत ताप, तीव्र डोकेदुखी, सूज, पाठदुखी, स्नायू दुखणे आणि थकवा यासारखी लक्षणे दिसून येतात.
मंकीपॉक्स सुरुवातीला चिकनपॉक्स, गोवर किंवा चेचक यांसारखा दिसतो.
ताप आल्यानंतर एक ते तीन दिवसांनी त्याचा परिणाम त्वचेवर दिसू लागतो.
शरीरावर पिंपल्स दिसतात.
हात, पाय, तळवे, पायाचे तळवे आणि चेहऱ्यावर लहान मुरुम दिसण्यास सुरुवात होते.
हे मुख्यतः चेहरा आणि हाताचे तळवे आणि पायांच्या तळवे यांना प्रभावित करते.
मंकीपॉक्सचा उपचार
मंकीपॉक्सचा संशय असल्यास, आरोग्य कर्मचाऱ्यांकडून योग्य नमुना गोळा करावा.
त्यानंतर नमुना सुरक्षितपणे प्रयोगशाळेत पोहोचला पाहिजे.
मंकीपॉक्सची पुष्टी नमुन्याचा प्रकार आणि गुणवत्ता आणि प्रयोगशाळा चाचणीच्या प्रकारावर अवलंबून असते.
मंकीपॉक्स नियंत्रित करण्यासाठी लसीकरणाचे मूल्यांकन करण्यासाठी अभ्यास सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.