Zila Parishad School Open saam tv
महाराष्ट्र

School Open: सीबीएसई पॅटर्न; पहिलीच्या विद्यार्थ्यांची शाळा भरणार १ एप्रिलपासून

Zila Parishad School Open: बालभारतीकडून सध्या युद्धपातळीवर पुस्तकांची छपाई सुरू आहे. ‘सीबीएसई’च्या शाळा आता १ एप्रिलपासून सुरू होणार आहेत. त्या धर्तीवर राज्य सरकारच्या शाळा सुरू होणार आहेत.

Bharat Jadhav

पहिलीच्या विद्यार्थ्यांची शाळा १ एप्रिलपासून भरणार आहे. अध्यापनाचे दिवस २२० होण्यासाठी पहिली ते नववीची परीक्षा सीबीएसईच्या वेळापत्रकाप्रमाणे होणार आहे. ‘सीबीएसई’च्या शाळा आता १ एप्रिलपासून सुरू होणार आहेत. याच धर्तीवर आगामी काळात राज्यातील सर्वच शाळांच्या शैक्षणिक वर्षाची सुरूवात होणार आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार यंदा अंगणवाडी ते इयत्ता दुसरीपर्यंतचा अभ्यासक्रम बदलण्यात येणार आहे. बालभारतीकडून सध्या युद्धपातळीवर पुस्तकांची छपाई सुरू आहे.

राज्यात आता शाळेची घंटा १ एप्रिलपासून वाजणार आहे. नेहमी १३ जूनला भरणारी शाळा आता नव्या शैक्षणिक वर्षापासून १ एप्रिलला भरवण्याचा निर्णय सूकाणू समितीनं घेतलाय. सीबीएसई पॅटर्ननुसार हा अभ्यासक्रम आता राज्यात राबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. याबाबतची शिफारस राज्य सरकारकडे करण्यात आली होती. नव्या शैक्षणिक वर्षासोबतच काय नेमक्या तरतूदी आहेत पाहुया.

अभ्यासक्रमात नवे बदल

तासिका ४५ मिनिटांऐवजी ५० मिनिटांच्या असतील

सीबीएसईप्रमाणेच राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमात असेल

गणित आणि विज्ञान विषय सीबीएसई प्रमाणेच असेल

दहावी-बारावी बोर्ड परिक्षेची रचना बदलणार, वर्षांतून दोन परिक्षा होणार

सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्याची १० दिवस दफ्तराविना शाळा होणार आहे.

विद्यार्थ्यांच्या आवडीच्या विषयात इंटर्नशिपची संधी देण्यात येणार आहे.

एक वेळापत्रक

राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिली ते नववीच्या परीक्षा मार्चअखेरीस अथवा एप्रिल महिन्यामध्ये शाळास्तरावरून घेण्यात येतात. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीस वार्षिक परीक्षा पूर्ण झाल्यास त्यानंतरच्या कालावधीत शाळा सुरू असल्या तरी विद्यार्थी उपस्थिती पुरेशी नसते. त्यामुळे परीक्षांचे आयोजन वर्षअखेर करण्याऐवजी लवकर केल्यामुळे विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी मिळणारा कालावधी कमी होत असतो.

प्रत्येक शाळेचे वेळापत्रक वेगवेगळे असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे राज्यातील शाळांमध्ये एकच वेळापत्रक लागू केले जाणार आहे. राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी अनुदानित शाळांमध्ये इयत्ता ३री ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांचे (पॅट) आयोजन करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Rain Alert : राज्यभरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा | VIDEO

BOB Recruitment: बँक ऑफ बडोदात नोकरीची संधी, २५०० पदांसाठी भरती, पगार ८५००० रुपये; आजच अर्ज करा

Raj & Uddhav Thackeray: ठाकरे बंधूंचा नवा टीझर; मराठी अस्मितेचा बुलंद आवाज पुन्हा दुमदुमला|VIDEO

Devshayani Ekadashi: देवशयनी एकादशीचं काय आहे महत्त्वं? जाणून घ्या पूजेची योग्य वेळ

SCROLL FOR NEXT