Washim News: जिल्हा परिषदेच्या शाळांचे वेळापत्रक बदलले; आजपासून सकाळीच वाजणार घंटा

Washim Zilla Parishad School Schedule : उन्हाच्या तीव्रतेमुळे जिल्हा परिषदेच्या शाळांचे वेळापत्रक बदलले आहे. आजपासून सकाळच्या सत्रात शाळा सुरू झालीय.
Washim News
Washim Zilla Parishad School Schedulesaam tv
Published On

मनोज जैस्वाल, साम प्रतिनिधी

वाशिम जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत असल्याने जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. जिल्ह्यात आजपासून शाळा सकाळी ७:३० ते ११:३० या वेळेत भरविण्यात येणार आहेत. उन्हाळ्यात दरवर्षी शाळांचे वेळापत्रक बदलले जाते. यंदाही शिक्षक संघटनांनी सकाळच्या सत्रात शाळा घेण्याची मागणी केली होती त्यानुसार प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

वाशिम जिल्ह्यात एकूण ७७२ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहेत. यापूर्वी शाळेची वेळ सकाळी ७:३० ते १२:३० ठेवण्याचा निर्णय झाला होता. मात्र, १२:३० वाजता शाळा सुटल्यास विद्यार्थ्यांना उन्हाच्या त्रासाला सामोरे जावे लागेल, असे शिक्षक संघटनांचे म्हणणे होते. त्यामुळे प्रशासनाने वेळ बदलून सकाळी ७:३० ते ११:३० करण्याचा अंतिम निर्णय घेतला आहे.आजपासून या नवीन वेळापत्रकाची अंमलबजावणी करण्यात आली आहे.

Washim News
Ajit Pawar : अर्थमंत्री अजित पवार अंतरिम अर्थसंकल्प मांडणार; शेतकरी, नोकरदार वर्ग आणि महिलांना काय मिळणार?

दरम्यान सूर्य तळपायला लागल्याने उन्हाचा चटका वाढू तापदायक ठरतोय. उकाड्यात मोठी वाढ झाल्याने अंगाची लाही होतेय. काल सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर ३९.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय. आज मुंबईसह कोकणात उष्ण लाटेची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आलाय. उर्वरित राज्यात उन्हाची तापमान कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय.

Washim News
ZP School Timing: नाशिकमधील जिल्हा परिषदेच्या शाळांची बदलली वेळ; जाणून घ्या कधी वाजणार शाळांची घंटा?

सर्व शाळांमध्ये आता एकच वेळापत्रक

राज्यातील सर्व शाळांमध्ये एकवाक्यता असावी. विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी उपलब्ध वेळेचा पुरेपूर उपयोग व्हावा, यासाठी वार्षिक परीक्षा आणि संकलित चाचणी २, नियतकालिक मूल्यांकन (पीएटी) चाचण्यांचे आयोजन एकाच वेळी केले जाणार आहे. यानुसार ८ एप्रिल ते २५ एप्रिल या कालावधीत परीक्षा घेतल्या जाणार आहेत. याबाबतचे परीक्षांचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आलंय.

नाशिकमधील जिल्हा परिषदेच्या शाळांची बदलली वेळ

वाढत्या उन्हामुळे नाशिकमधील जिल्हा परिषदेच्या शाळांच्या वेळेत बदल करण्यात आलाय. नाशिक जिल्ह्यातील शिक्षकांनी शाळांच्या वेळेत बदल करण्यात यावा, अशी मागणी केली होती. शाळांच्या वेळेत बदल करण्यात आले आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागेपर्यंत दुपार सत्राच्या शाळा आता सकाळी साडेसात ते ११.४५ वाजेपर्यंत भरतील. मार्च महिन्यात उन्हाचा तडाखा अजून वाढणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com