
उन्हाळा सुरू झाला असून तापमानाचा पार वरती चढू लागलाय. तापमान वाढल्याने अंगाची लाही-लाही होतेय. या वाढत्या उन्हामुळे नाशिकमधील जिल्हा परिषदेच्या शाळांच्या वेळेत बदल करण्यात आलाय. नाशिक जिल्ह्यातील शिक्षकांनी शाळांच्या वेळेत बदल करण्यात यावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर शाळांच्या वेळेत बदल करण्यात आले आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागेपर्यंत दुपार सत्राच्या शाळा आता सकाळी साडेसात ते ११.४५ वाजेपर्यंत भरतील.
आजपासून निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरुवात झालीय. नाशिक जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. उन्हाळी सुट्यांपर्यंत सकाळच्या सत्रात शाळा भरणार आहे. दरम्यान मार्च महिन्यात उन्हाचा तडाखा अजून वाढणार आहे, मुंबईकरांसाठी हा महिनात जास्त तापदायक ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जागतिक तापमानात सरासरी दीड अंशांनी वाढ झालीय.
जानेवारी २०२५ हा महिना आतापर्यंतचा इतिहासातील सर्वात उष्ण महिना म्हणून नोंदला गेलाय. वातावरणातील अडथळे असलेले अल निनो आणि ला नीनो ही दोन्ही संकटे यावर्षी स्थिरावलेलीत. यामुळेच तापमानात होणारे कमी-अधिक बदल देखील स्थिरावण्याची शक्यता आहे. मुंबईत पुढील तीन दिवसांसाठी तापमान स्थिर राहणार असल्याचा अंदाज आहे. कमाल तापमान ३६ अंशाच्या वर राहणार असल्याने उन्हाचा तडाखा कायम राहिलं.
कुलाबा वेधशाळेने हा अंदाज व्यक्त केलाय. त्यांनी पुढील २४ तासांसाठी वर्तवलेल्या अंदाजानुसार, शहर आणि उपनगरात कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३६ अंश सेल्सिअस आणि २२ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
तीव्र उन्हात शारीरिक श्रमाची, कष्टाची कामे बराचवेळ केल्याने.
कारखान्याच्या बॉयलर रूममध्ये तासन् तास काम करणे.
जास्त तापमानाच्या खोलीमध्ये खूप वेळ काम करणे.
जीन्ससारख्या घट्ट कपड्यांचा नियमित वापर करणे.
वाढत्या तापमानाशी सतत संपर्कामुळे उष्माघात होऊ शकतो.
उन्हाचा धक्का बसताच रुग्णास प्रथम सावलीत आणावे. रुग्णाचे तापमान कमी करण्यासाठी कपडे सैल करून त्वरित अंग थंड पाण्याने पुसत राहावे. रुग्णास हवेशीर व थंड खोलीत ठेवावे, खोलीतील पंखे, कुलर, एअर कंडिशनर्स त्वरित चालू करू नये. रुग्ण शुद्धीवर आल्यास त्यास थंड पाणी द्यावे. सुरवातीला चहा, कॉफी देऊ नये. रुग्णाच्या काखेखाली आइसपॅक ठेवावेत, रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याचा पट्ट्या ठेवल्या पाहिजेत. थर्मामीटरने रुग्णाचे तापमान 36.8 सेल्सिअसच्या खाली तापमान होईपर्यंत वरील उपचार करावेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.