CBSE Board 10th Result 2024 Saam TV
महाराष्ट्र

CBSE Board 10th Result 2024: CBSE १० वीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली; परीक्षेचा निकाल जाहीर

CBSE Board 10th Result 2024 : मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात या रिजल्टबाबत चर्चा सुरू होती. मात्र रिजल्टची अॅक्च्युअल डेट समोर आली नव्हती. अशात हा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

Ruchika Jadhav

सीबीएससी बोर्डाने १२ वी पाठोपाठ आज १० वीचा निकाल देखील जाहीर केला आहे. विद्यार्थी गेल्या अनेक दिवसांपासून निकालाची वाट पाहत होते. अशात आज निकाल जाहीर करण्यात आलाय. यंदा १२ वीच्या परीक्षेला १७ लाखांहून अधिक विद्यार्थी होते. सीबीएससी बोर्डाचा १०वीचा निकाल cbse.gov.in, cbse.nic.in, results.cbse.nic.in आणि cbseresults.nic.in या साईटवर पाहता येणार आहे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाने १०वी आणि १२वीचा रिजल्ट घोषित केला आहे. पेपर तपासणीचे काम एप्रिलच्या शेवटपर्यंतच पूर्ण झाले होते. तसेच मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात या रिजल्टबाबत चर्चा सुरू होती. मात्र रिजल्टची अॅक्च्युअल डेट समोर आली नव्हती. अशात हा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

टॉपर लिस्ट जाहीर होणार नाही

१० वी आणि १२वीचं वर्ष आयुष्याला कलाटनी देणारं असतं. विद्यार्थी वर्षभर मेहनत घेतात त्यानंतर त्यांना आपण घेतलेल्या मेहनतीचं यश मिळतं. अशात काहींना या स्पर्धेत अपयश देखील येतं. त्यामुळे विद्यार्थी नैराश्यात जातात आणि आत्महत्ये सारखी कठोर भुमीका देखील घेतात. या सर्व कारणांमुळे बोर्डाने टॉपर लिस्ट जाहिर न करण्याचा निर्णय घेतला आहे.

इयत्ता 10वीच्या परीक्षेत उत्तिर्णतेची टक्केवारी 93.60% आहे. गेल्या वर्षी ९३.१२ टक्के विद्यार्थी दहावीत यशस्वी झाले होते. यंदा 0.48% टक्क्यांनी रिजल्ट जास्त आहे. 10वीच्या परीक्षेत एकूण 93.12 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात मुली ९४.२५ टक्के तर मुले ९२.७२ टक्के उत्तीर्ण झाले आहेत.

CBSE इयत्ता 10 ची मार्कशीट अशी डाउनलोड कराल?

CBSE DigiLocker वर रिजल्ट अपलोड करण्यात आला आहे.

हॉल तिकीटवर असलेल्या नंबरच्या मदतीने digilocker.gov.in cbse वर लॉग इन करा.

त्यानंतर तुमची CBSE 10वीची मार्कशीट डाउनलोड करू शकता.

तुमच्याकडे पिन नसेल तर तुम्ही तुमच्या आधार क्रमांकावरून CBSE 10वीची मार्कशीट डाउनलोड करता यईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT