Student Aadhar Card Update : २ लाख ७४ हजार ४३१ विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक चुकीचे

Sambhajinagar News : शाळेत प्रवेशापासून ते पोषण आहार, शिष्यवृत्ती आणि इतर सुविधांसाठी शासकीय अनुदानित शाळांमध्ये आधार कार्ड असलेल्या विद्यार्थ्यांनाच आता लाभ दिला जाणार आहे
Student Aadhar Card Update
Student Aadhar Card UpdateSaam tv

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये २ लाख ७४ हजार ४३१ शालेय विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक चुकीचे आहेत. तर ५० हजार विद्यार्थ्यांच्या आधारची प्रक्रिया अद्याप होणे बाकी असल्याची (sambhajinagar) माहिती शिक्षण विभागाच्या आकडेवारीतून समोर आली आहे. हे आधार अपडेट नसलेल्या विद्यार्थ्यांना लाभ मिल्ने शक्य नसल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. 

Student Aadhar Card Update
Railway Crime : तामिळनाडूहुन कल्याणला आलेली चोरट्यांची टोळी गजाआड; १२ गुन्हे उघडकीस

शाळेत प्रवेशापासून ते पोषण आहार, शिष्यवृत्ती आणि इतर सुविधांसाठी शासकीय अनुदानित शाळांमध्ये आधार कार्ड (Aadhar Card) असलेल्या विद्यार्थ्यांनाच आता लाभ दिला जाणार आहे; असे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे शाळांमध्ये पालकांनी अपडेट करून त्याची माहिती द्यावी; असे पालकांना सुचित (Student) करण्यात आले होते. मात्र वारंवार सूचना देऊनही आधार जमा नसल्याच्या तक्रारी कायम आहेत. आता पालकांना नवीन आधार किंवा आधार अपडेट करण्याचे काम करावे लागणार आहे. 

Student Aadhar Card Update
Nanded Temperature : नांदेड जिल्ह्यात उच्चांकी तापमानाची नोंद; पारा पोहचला ४३ अंशाच्या वर

अन्यथा निधी कमी 

आता नव्या सत्रातील गणवेशासह शालेय पोषण आहार (Poshan Aahar) निधी कमी मिळेल असं शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलंय. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षकांची आधार वैधता तात्काळ पूर्ण करा; त्यानुसारच शाळांना पुढील वर्षाचे बजेट दिले जाणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com